'थुकरटवाडीत' आली 'लयभारी' जोडी| Chala Hawa Yeu Dya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

genelia dsouza and ritesh-deshmukh
'थुकरटवाडीत' आली 'लयभारी' जोडी

'थुकरटवाडीत' आली 'लयभारी' जोडी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. आठवड्याच्या सुरुवातीला रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येत असतात. आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात ‘बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल’ हजेरी लावणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांची जोडी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात येणार असून नुकतंच त्याचा एक व्हिडीओ झी मराठीच्या अधिकृत पेजवर पोस्ट केला आहे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सुरुवात ही लयभारी या चित्रपटाच्या टीमसोबत झाली होती. आता आठ वर्षांनी रितेश या मंचावर लयभारी आणि माउली चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देणार असून त्याच्या जोडीला जिनिलिया देखील असणार आहे. झी मराठीने युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील विनोदवीर रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटातील काही सीन रिक्रेट करताना दिसत आहे. मात्र लय भारी आणि माउली या चित्रपटांवर आधारित एक प्रहसनावर रितेश आणि जिनेलियाला पोट धरून हसाताना दिसतात. विशेष म्हणजे लय भारी चित्रपटातील अनेक सीन्स या विनोदवीरांनी दाखवले आहेत. तर लय भारी चित्रपटातील आला होळीचा सण लय भारी हे गाणंही त्यांनी फार विनोदी पद्धतीने चित्रित केले आहे. जवळपास ९ मिनिटांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

genelia dsouza and ritesh deshmukh

genelia dsouza and ritesh deshmukh

हेही वाचा: 'तुझ्यासमोर रणवीर पण फिका'; आकाश ठोसरचा लूक चर्चेत

सोबतच झी मराठीने इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात रितेश, जिनिलिया आणि निलेश साबळे हे दिसत आहे. “लई भारी जोडी …! ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ..! पहा या सोमवार ते बुधवार आपल्या थुकरटवाडीत रितेश देशमुख आणि जेनिलिया वहिनी यांची मराठमोळी धमाल…!”चला हवा येऊ द्या,” असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. पण रितेश आणि जिनिलिया या कार्यक्रमात येण्यामागचं नेमकं कारण काय? हे अद्याप समोर आलं नाही, त्यामुळे ही धमाल मस्ती पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या सोमवार ते बुधवार रात्री ९९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

loading image
go to top