
Lalit modi : ललित मोदींची गुगली; इंस्टा बायोमधून सुष्मिता सेनचा उल्लेख काढला
sushmita sen, lalit modi Latest News इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) स्थापना करणाऱ्या ललित मोदीने (Lalit Modi) अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे इंस्टाग्राम प्रोफाईल चित्र हटवले आहे. सुष्मिताचे (Sushmita Sen) नाव काढून टाकण्यासाठी त्याने बायो देखील बदलला आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा सार्वजनिक झाल्या होत्या. आयपीएलचे पहिले अध्यक्ष ललित मोदी जुलैमध्ये प्रथमच माजी मिस युनिव्हर्ससोबतच्या नातेसंबंधाबद्दल बोलले आणि मालदीवमध्ये तिच्यासोबतच्या सुट्टीचे फोटे शेअर केले होते.
यानंतर ललित मोदींनी फोटो शेअरिंग ॲपवर सुष्मिता सेनसोबतचे त्यांचे प्रोफाईल पिक्चर ठेवले होते. त्यांनी प्रोफाईल आणि बायो अपडेट केले होते. ‘संस्थापक @iplt२० इंडियन प्रीमियर लीग - शेवटी जोडीदारासोबत नवीन जीवन सुरू करीत आहे. माझी प्रिय सुष्मिता सेन (sic)’, असे लिहिले होते.
मात्र, मंगळवारी ललित मोदीच्या (Lalit Modi) इन्स्टाग्राम प्रोफाईलवर वेगळेच प्रोफाईल चित्र होते. सुष्मिता सेनचे नाव आता बायोमध्ये नाही. आता लिहिले आहे, ‘संस्थापक @iplt२० इंडियन प्रीमियर लीग - मून’. दरम्यान, त्यांचे नाते संपुष्टात आल्याची चर्चा होती. आतापर्यंत ललित मोदी किंवा सुष्मिता सेन (Sushmita Sen) या दोघांनीही या अफवांकडे लक्ष दिले नव्हते.