Lata Mangeshkar: "मेरी आवाज ही पहचान है..."; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची 'ही' सदाबहार गाणी नक्की ऐका

Lata Mangeshkar: आजही लोक लता दीदींची गाणी आवडीनं ऐकतात. जाणून घेऊयात लता दीदींच्या एव्हरग्रीन गाण्यांबद्दल...
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज पुण्यतिथी आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. लता दीदींच्या निधनाने संगीतविश्वाची मोठी हानी झाली. आजही लोक लता दीदींची गाणी आवडीनं ऐकतात. जाणून घेऊयात लता दीदींच्या एव्हरग्रीन गाण्यांबद्दल...

1. प्यार किया तो डरना क्या (Pyaar Kiya To Darna Kya)

लता मंगेशकर यांच्या प्यार किया तो डरना क्या या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. हे गाणे 1960 मध्ये रिलीज झालेल्या मुघल ए आझम या चित्रपटातील आहे.

2. ऐ मेरे वतन के लोगों (Ae Mere Watan Ke Logon)

ऐ मेरे वतन के लोगों हे लता मंगेशकर यांचे देशभक्तीपर गीत लोक आजही ऐकतात. ऐ मेरे वतन के लोगों हे कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले देशभक्तीपर गीत आहे. हे गाणे 1962 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना समर्पित करण्यात आले होते.

3. सोलह बरस की बाली उमर को सलाम (Solah Baras Ki Bali Umar)

सोलह बरस की बाली उमर को सलाम हे गाणं लता मंगेशकर, एस.पी बालसुब्रमण्यम यांनी गायले आहे. हे एक दूजे के लिए या चित्रपटातील गाणे आहे.

4. एक प्यार का नगमा है (Ek Pyar Ka Nagma hai)

1972 मध्ये रिलीज झालेल्या शोर या चित्रपटातील एक प्यार का नगमा है या लता मंगेशकर यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

5. आज फिर जीने की तमन्ना है

गाइड या चित्रपटातील आज फिर जीने की तमन्ना है हे गाणे देखील अनेकांना आवडते. या गाण्याचे गीतकार शैलेंद्र हे आहेत तर संगीतकार हे सचिन देव बर्मन हे आहेत.

तसेच मेरी आवाज ही मेरी पहचान है,सत्यम शिवम सुंदरम आणि हाय-हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी यांसारखी गाणी देखील लता मंगेशकर यांनी गायली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com