Lata Mangeshkar: कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव द्यावं, मंगेशकर कुटुंबियांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lata Mangeshkar

Lata Mangeshkar: कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव द्यावं, मंगेशकर कुटुंबियांची मागणी

स्वरा कोकिळा लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. गेल्या वर्षी आजच ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लतादीदींनी या जगाचा निरोप घेतला होता.आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व स्तरातुन त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

दरम्यान, मुबंईची नवी ओळख होऊ पाहणाऱ्या कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी केली आहे. प्रसिद्ध गायिका आणि लता मंगेशकर यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.

मुंबईतील हाजी अली चौकात लतादीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनाला उषा मंगेशकरही उपस्थित होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, 'महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा मोठा प्रकल्प होतोय आणि तो आमच्या घराजवळच बनत आहे. त्यामुळं याला दीदींच नाव द्यावं अशी आमची इच्छा आहे. लोढाजी हे या प्रकल्पाच्या कामात सक्रिय आहेत. महानगर पालिकाही आमच्या सोबत आहे. त्यामुळे यास लती दिदींच नावं देण्यात यावं ,असं आम्हाला वाटतयं आणि ते होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.'

स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी उषा मंगेशकर बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, "त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन एका वर्षात झाले याचा त्यांना खूप आनंद आहे, दरम्यानच्या काळात आम्ही राज्य सरकारला कोस्टल रोडला लता दीदींचे नाव देण्याची विनंती केली आहे."

2001 मध्ये लतादीदींना भारताचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे भारतरत्न असलेल्या लता दिदीचं नावं या रोडला देण्यात यावं या मागणीला आता सरकार कसा प्रतीसाद देईल हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

मुंबईला मीरा-भाईंदर, वसई-विरार, नवी मुंबई आणि ठाणे यासह कल्याण, भिवंडी यांना जोडण्यासाठी बीएमसी अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. यामध्ये कोस्टल रोड सर्वात प्रमुख आहे.

टॅग्स :lata mangeshkar