Shantabai Kopargaonkar
Shantabai Kopargaonkar

Shantabai Kopargaonkar : कशी नशीबाने थट्टा मांडली, तमाशा गाजवणाऱ्या लावणी लावणीसम्राज्ञीवर भीक मागण्याची वेळ

Published on

Shantabai Kopargaonkar : एकेकाळी तमाशा गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावक यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. शांताबाई लोंढे अर्थाच लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांनी एकेकाळी तमाशाचा फड गाजवला होता.

शांताबाई कोपरगावक यांच्या सौंदर्याची भुरळ रसिकांना पडायची. लालबाग परळचं हनुमान थिएटरमध्ये त्यांच्या अदाकारीवर लोकांच्या टाळ्या शिट्ट्या आणि वन्स मोअर यायच्या. पण वयोमानानं याच महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञीवर भीक मागायची वेळ आली आहे, कुणी घर देत का घर, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (latest marathi news)

३० - ४०  वर्षांपुर्वी शांताबाई कोपरगावकर यांनी आपल्या नृत्याने उत्तर महाराष्ट्र, खानदेश गाजवला. भिका सांगवीकर, शंकरराव खर्डीकर असे तमाशाचे फड त्यांनी गाजवले.

त्यांचा पहाडी आवाज आणि अदाकारीपाहून चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी 'शांताबाई कोपरगावकर' हा तमाशा काढला. ज्यातून शांताबाई ५०- ६० लोकांचे पोट भरायच्या. यात्रेत, नाट्यगृहात त्याच्या अदाकारीवर टाळ्या पडायच्या. पण वय झालं, चेहऱ्यावर सुरकरुत्या आल्या आणि तमाशाचा फज बंद झाला.

Shantabai Kopargaonkar
Rajeev Khandelwar : 'महिलांचे ठीक आहे, पुरुषांनी काय करायचं'? कास्टिंग काऊचवर प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

असं म्हटलं जात महाराष्ट्रात कलाकारांना वाव दिला जातो. पण याच महाराष्ट्रात लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांच्यावर भीक मागायची वेळ आली आहे.

७० वर्षांच्या शांताबाई या बस स्थानकावर भीक मागून खातात.सरकारकडून कधीतरी पेंशन मिळते पण पोटाची खळगी भरण्यासाठी शांताबाई कोपरगावच्या बस स्थानकावर भीक मागताना पहायला मिळतात. आजही त्यांचा आवाज तितकाच पहाडी आहे. त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. 

Shantabai Kopargaonkar
Kangana Ranaut Post: कुणाचं काही ऐकु नका, माझ्या चित्रपटाला नावं ठेवू नका! कंगणाची पोस्ट व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com