'छपाक' पाहिल्यावर लक्ष्मी अग्रवालच्या मुलीची अशी होती प्रतिक्रिया

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

चित्रपट पाहताना मालतीच्या किंकाळ्या ऐकुन अंगावर शहारा येतो. पण, त्या भयानक ऍसिड हल्ल्यातून बचावलेली पीडिता म्हणजे लक्ष्मी अग्रवाल.नुकताच तिच्या मुलीने 'छपाक' हा सिनेमा पाहिला. पिहू असं तिचं नाव आहे. आईच्या आयुष्यातील त्या भयावह प्रंसंगावर आधारीत असलेला चित्रपट तिने पाहिला. 

मुंबई : सध्या सर्वत्रच 'छपाक' चित्रपटाचं वारं वाहतयं. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 10 तारखेला तो प्रदर्शित झाला असून  राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आणि महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शिनामध्य़े असंख्य अडचणी आल्या. दीपिका विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी जेएनयु मध्ये पोहोचली पण,  त्यानंतर देशभरातून तिच्यावर उलट सुलट प्रतिक्रिया देण्यात आल्या. एवढचं काय तर, 'छपाक' ला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर झाला. तरीही छपाक प्रदर्शित झाला आणि त्याच्याविषयी लोकांनी सकारात्मक मते दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Best morning khas morning  Good morning  With my Loves @pihu_she @deepikapadukone 

A post shared by Laxmi Agarwal (@thelaxmiagarwal) on

चित्रपट पाहताना मालतीच्या किंकाळ्या ऐकुन अंगावर शहारा येतो. पण, त्या भयानक ऍसिड हल्ल्यातून बचावलेली पीडिता म्हणजे लक्ष्मी अग्रवाल. लक्ष्मीचा जन्म दिल्लीमधला. मध्यमवर्गीय घरातील लक्ष्मीची सामान्य मुलीसारखीच स्वप्न होती. वयाच्या 15 व्या वर्षीच तिनं गायक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. पण त्याचवेळी लक्ष्मीसोबत भयानक प्रसंग घडला ज्याने तिचं सारं आयुष्यचं पालटलं. लक्ष्मीवर हा हल्ला झाला आणि आता ती स्वत:सह तिच्या मुलीचा सांभाळ करत आहे. नुकताच तिच्या मुलीने 'छपाक' हा सिनेमा पाहिला. पिहू असं तिचं नाव आहे. आईच्या आयुष्यातील त्या भयावह प्रंसंगावर आधारीत असलेला चित्रपट तिने पाहिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Merry Christmas  With my Love @pihu_she #blessings #loveforever #merrychristmas #selfie

A post shared by Laxmi Agarwal (@thelaxmiagarwal) on

पिहूने तो चित्रपट शेवटपर्यंत पाहिला. लक्ष्मीच्या आयुष्यातील प्रत्येक घटना मालतीच्य़ा रुपामध्ये या सिनेमामध्ये दाखविण्य़ात आली आहे. पिहूने हा चित्रपट पाहिल्यावर तिच्या निरागस मनाला पडलेले सर्व प्रश्न तिने आई लक्ष्मीला विचारले. लक्ष्मी पिहूच्या प्रतिक्रियेविषयी बोलताना म्हणाली, 'सिनेमा पाहिल्यावर पिहूने मला खूप प्रेम दिले. मला आणि मालती साकारलेल्या दीपिकाला तिने घट्ट मिठी मारली. पिहू तिच्या वयाच्या मानाने खूप समजुतदार आहे. माझ्यासोबत झालेल्या सर्व घटनांची माहिती तिला आहे आणि आईच्या संघर्षाची तिला पूर्ण जाणीव आहे.'

दीपिकाच्या 'छपाक'ला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे. अजय देवगणच्या 'तान्हाजी' ने त्यावर बाजी मारली असली तरी मात्र प्रेक्षकांनी चित्रपटाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वच स्थारातून दिग्दर्शक मेघना गुलजार आणि दीपिकाच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laxmi agarwal daughter pihu reacted on the movie chappak