esakal | टाइगरनं वार्दाला शिकवले मास्टरस्ट्रोक्स! : व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood RAMBO Remake Signs Tiger Shroff's Perm In Lead Role

टाइगरनं वार्दाला शिकवले मास्टरस्ट्रोक्स!

sakal_logo
By
टीम इसकाळ

सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये अॅक्शन हिरो म्हणून ज्यानं आपल्या नावाची ओळख तयार केली आहे अशा टायगर श्रॉफची मोठी क्रेझ आहे. येत्या काळात त्याच्या दोन ते तीन मुव्हीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना त्याच्या चित्रपटांचे वेध लागले आहेत. गेल्या काही काळापासून त्याचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. टायगरच्याच पुढील एका भागामध्ये तो दिसणार आहे. याशिवाय गणपत नावाची फिल्मही त्याच्याकडे आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी फोटो व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. सध्या लंडनमध्ये असलेल्या वार्दा नाडियाडवालानं टायगरचे वर्कआउट सेशन्स घेतले आहे. याशिवाय टाइगरनंही तिला काही मास्टरस्ट्रोक्स शिकवले आहेत. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

‘हीरोपंती 2’च्या सेटवरून काही अनोखे क्षण, ज्याचे लक्षवेधक फोटोज वार्दाने आपल्या सोशल मीडिया पेजवर देखील शेयर केले आहेत. तिनं त्या फोटोविषयी लिहिलं आहे की, एका लिजंडकडून मास्टरस्ट्रोक शिकायला मिळाले. याचा आनंद आहे. त्यावर अभिनेता टायगरनंही त्यावर तिला उत्तर दिलं आहे. त्यानं लिहिलं आहे की, ग्रेट वर्क. केवळ स्टंटमॅन म्हणून नव्हे तर एक चांगला डान्सर म्हणूनही टायगर श्रॉफची त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. लहानांपासून मोठ्यापर्यत त्याच्या डान्सचे चाहते आहेत. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या टायगरचे व्हिडिओ हे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते.

वार्दा नाडियाडवालानं ट्रेनिंग सेशन्स खूप एन्जॉय केले होते. आणि त्यासाठी टायगरचे आभारही मानले आहेत. हीरोपंती 2 साठी चाहते आणि प्रेक्षक खरोखरच खूप उत्सुक आहेत आणि या नुकत्याच मिळालेल्या अपडेट्समुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. वार्दा नाडियाडवाला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

हेही वाचा: टायगर 3 मधला हा अभिनेता कोण? ओळखा पाहू

हेही वाचा: टायगर चक्क गाणं म्हणतोयं, 'वंदे मातरम'चा भन्नाट लूक

loading image
go to top