
आपल्या आवाजानं श्रोत्यांना आपलेसे करणा-या एस. पी. बालसुब्रमण्यम यांना गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी एमजीएम हेल्थकेअरमध्ये दाखल करण्यात आले होते.
मुंबई - आपल्या जादूई आवाजानं रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे गायक म्हणून एस पी बालसुब्रमण्यम यांची ओळख होती. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांना नुकताच मरणोत्तर पद्ममविभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. सोमवारी राष्ट्रपती भवनातून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाकडून पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली.वेगवेगळ्या 16 भाषांमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गाणारे गायक म्हणून त्यांची ओळख होती.
या यादीत बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचं सांगण्यात आलं आहे. बालसुब्रमण्यम यांनी हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आपल्या गोड आवाजाने त्यांनी भारावून टाकली. गायनाची आगळी वेगळी शैली यामुळे एस पी यांचा चाहतावर्ग प्रचंड होता. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या गाण्याचे चाहते आहेत. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतसृष्टीला मोठा धक्का बसला होता. बॉलीवूडचा स्टार अभिनेता सलमान खान यांची बरीचशी गाणी एस पींनी गायली होती. ती गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यांच्या संगीत कारकिर्दीमध्ये त्यांनी सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
Former Prime Minister of Japan Shinzo Abe, Singer S P Balasubramaniam (posthumously), Sand artist Sudarshan Sahoo, Archaeologist BB Lal awarded Padma Vibhushan. pic.twitter.com/ODnDEGOJbi
— ANI (@ANI) January 25, 2021
आपल्या आवाजानं श्रोत्यांना आपलेसे करणा-या एस. पी. बालसुब्रमण्यम यांना गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी एमजीएम हेल्थकेअरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडाफार फरक पडला. मात्र पुन्हा काही दिवसांनी त्रास जाणवू लागला. त्यात त्यांचा 25 सप्टेंबर रोजी मृत्यु झाला.
बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या गाण्यांची यादी मोठी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये 16 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. एसपी यांनी वेगवेगळ्या 16 भाषांमध्ये गाणी गायली. एका दिवसांत 19 गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम केला होता. त्यांच्या गायनानं रसिकांना अविस्मरणीय असा आनंद दिला. त्यांची ‘साथिया ये तुने क्या किया’, ‘ये हसीन वादियाँ’, ‘सच मेरे यार’, ‘आ जा शाम होने आयी’, ‘तेरे मेरे बीच में’ ही गाणी तुफान लोकप्रिय झाली.