'जिंदगी' आणि 'स्व'चा शोध..

धावपळीच्या जीवनात आपण स्वतःलाच कुठेतरी हरवत चाललो आहोत.
rajesh khanna
rajesh khanna

संदीप काळे-

जिंदगी कैसी है पहेली हाय

कभी तो हँसाए, कभी ये रुलाये...

'आनंद' चित्रपटातील मनाला भावणारे हृदयस्पर्शी असे गीत. सकाळी सकाळी आज कानावर पडले. कितीवेळा ऐकले तरी अनेकवेळा ऐकायची इच्छा होणारे. प्रत्येक शब्दाशब्दात काहीतरी अर्थ दडलेले असे हे गीत. मनुष्याला आपल्याच आयुष्याचे गूढ सांगणारे.

जीवन काय आहे? खरंच हा प्रश्न कधी कधी मनात येऊन जातो. जीवन या शब्दाचा अर्थ प्रत्येकांसाठी वेगवेगळा आहे. कारण, मनुष्य त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगानुसार जीवनाचा अर्थ घेत असतो. याच जीवनाचा अर्थ थोर नाटकार विलियम शेक्सपिअर यांनी, "जीवन एक रंगमंच आहे आणि आपण त्यातील कलाकार" असा घेतलेला आहे. प्रत्येकजण स्वतःच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघतो. कुणासाठी "जीवन म्हणजे एक खेळ आहे", कुणासाठी "जीवन एक ईश्वराकडून मिळालेली भेट आहे", कुणासाठी "जीवन एक प्रवास आहे", कुणासाठी "जीवन एक स्पर्धा आहे." असे कितीतरी अर्थ जीवन या शब्दाचे व्यक्तीनुसार आहेत. परंतु, अजूनही प्रश्न पडतो खरंच काय आहे 'जीवन'?

जीवन माणसाला काळानुसार अनेक गोष्टी शिकवत जाते. माणसाच्या वाट्याला सुख, दुःख, आनंद, निराशा, हारणे, जिंकणे, यश, अपयश अशा अनेक गोष्टी येतात. या प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढून माणसाला आपली वेगळी वाट शोधावी लागते. खरंतर जीवन म्हणजे, त्यातील उतार - चढाव पार करून आपले अस्तित्व निर्माण करणे होय, असे म्हणायला काही हरकत नाही.

माणसाचे दैनंदिन जीवन जगणे चालूच असते, पण आपण या जीवनात जीवनाचे सौंदर्य कशात आहे, हे शोधतो का? किंवा त्याचे महत्व कशात आहे याचा कधीतरी विचार केला आहे का? धावपळीच्या जीवनात आपण स्वतःला कुठेतरी हरवत चाललो आहे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे विसरून गेलो आहोत. माणसाला आजकाल निराशेने ग्रासून टाकले आहे. कारण, आजकालचे वातावरण सुद्धा त्याला कारणीभूत आहे. पण, आता जीवनातील आता या सत्याचा स्विकार करून आपल्याला जगावे लागणार आहे. ही, परिस्थिती आज नाहीतर उद्या जाणार आहे कारण, या जगात कायमचे असे काहीच नसते. त्यामुळे, बाहेरची परिस्तिथी वाईट आहे म्हणून रोजच्या जगण्यातील आनंद का हरवायचा?

जीवनाचे सौंदर्य आणि त्याचे अस्तित्व, माणसाच्या जीवनात खूप आवश्यक आहे. अनेक, मोठ्या गोष्टी मिळविण्यासाठी क्षणिक गोष्टीतून मिळणारा आनंद आपण वाया घालवतो. जीवनातील सौंदर्य हे आहे की, एकांतात व्यतीत करणार्या् जीवनापेक्षा इतरांना मदत करीत, जीवन जगणे कधीही चांगले. कोणतीही गोष्ट इतरांना देण्यामध्ये जीवनाचे सामर्थ्य असते. जीवनातील, अस्तित्वाच्या लढाईत कुठल्याही माणसाला एकटे न पडू देता, त्यांची काळजी घेणे, मदत करणे अशा गोष्टीत जीवनातील वास्तविक सौंदर्य दडून असते. आपल्या, आजूबाजूला आपण एकमेकांना आदर, सन्मान जितका देऊ तितक्याच प्रमाणात तो आपल्याला परत मिळतो. आदर हा आरशा प्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तो तुम्हाला अधिक मिळेल.

आजच्या परिस्तिथीत जीवन खूप अस्थिर झाले आहे कारण, रोजच मृतांचा आकडा वाढतो आहे. प्रेतांची ढिगारे जमा होऊ लागली आहेत. खरंतर, प्रत्येकाचे जीवन महत्वाचे असते कारण ते एकमेकांशी संबंधित असते. मृत्यू झालेला व्यक्ती निघून जातो, परंतु असंख्य असे प्रश्न मागे राहतात ज्याची उत्तरे अनुत्तरीत असतात. जीवन हे असेच असते, कारण त्याची आपल्याला शाश्वती देता येत नाही. त्यामुळे, कधी जीवनाला सुंदर भेट म्हणून दिलेली उपमा ही बरोबर वाटते कारण त्याची आपल्यासोबत इतरांना सुद्धा काळजी असते. जीवन अनेक गोष्टींनी वेढलेले आहे. परंतु, या जीवना मधील सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे, या निसर्गाच्या सान्निध्यात माणसाचा जन्म झाला. इतर कुठल्याही ग्रहावर नसलेली गोष्ट म्हणजे, मानवप्राणी. त्यामुळे, पृथ्वी इतर ग्रहांपेक्षा श्रेष्ठ ठरते कारण त्यावर शेकडो काळापासून मानवी जीवन टिकून आहे. त्यामुळेच, मानवी जीवन सुंदर आणि अमूल्य अशी भेट आहे.

मानवी जीवन मनुष्याला मिळालेले एक उत्तम निसर्गाचे गूढ आहे. कारण, त्याला विचार करण्याची शक्ति उपजतच मिळालेली आहे. यामुळेच, तो ध्येय ठरवुन, त्यानुसार कार्य करून आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. खरंतर, यालाच आपल्याला जीवनातील सौंदर्य म्हणता येईल. जीवनाला, प्रवास म्हटले तर, तो प्रवास कधी सुरळीत असतो तर कधी खडतर असतो. परंतु, त्यातून प्रत्येकाला आपला आपला मार्ग शोधावा लागतो आणि कार्यरत राहावे लागते. जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे, आपण रोज त्यात काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कधी निराशेने ग्रासले नाही पाहिजे. जितके आयुष्य मिळाले आहे त्यात सर्वोत्तम काहीतरी करणे, हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट राहिले पाहिजे.

आनंद चित्रपटातील 'ज़िन्दगी कैसी है पहेली हाय कभी तो हँसाए, कभी ये रुलाये...' हे गीत ऐकताना आपण त्यात हरवुन जातो, कुठेतरी 'स्व'चा शोध घेतो. जीवनात अनेक भूमिका निभावताना माणसाला स्वतःकडे बघणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. या गीतातील प्रत्येक बोल माणसाच्या जीवनातील आंतरिक मनाशी निगडित आहे. त्यामुळे एकदातरी हे गीत सर्वांनी एकवेळ नक्की ऐकावे...

ज़िन्दगी कैसी है पहेली हाय

कभी तो हँसाए, कभी ये रुलाये

कभी देखो मन नहीं जागे

पीछे-पीछे सपनों के भागे

एक दिन सपनों का राही

चला जाये सपनों से आगे कहाँ

ज़िन्दगी कैसी है पहेली...

जिन्होंने सजाये यहाँ मेले

सुख-दुःख संग-संग झेले

वही चुनकर खामोशी

यूँ चले जाएँ अकेले कहाँ

ज़िन्दगी कैसी है पहेली...

चित्रपट : आनंद (1971)

संगीतकार : सलील चौधरी

गीतकार : योगेश

गायक : मन्ना डे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com