Liger: आतापर्यतचा सर्वात बोगस चित्रपट 'लायगर', IMDb कडून 1.71 रेटिंग!|Liger Flop Imdb rating 1.7 actor Vijay Devara Konda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liger IMDb rating news

Liger: आतापर्यतचा सर्वात बोगस चित्रपट 'लायगर', IMDb कडून 1.71 रेटिंग!

Liger Movie Rating: विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडेचा लायगर नुकताच प्रदर्शित झाला. मात्र त्याला काही प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. लायगरच्या वाट्याला अमाप लोकप्रियता येईल असा अंदाज कलाकारांसहित (Tollywood Movie News) निर्माते, दिग्दर्शकांना होता. मात्र तसे झाले नाही. एकीकडे बॉयकॉट बॉलीवूड असा ट्रेंड सुरु असताना त्याचा फटका लायगरला (Liger Movie Rating) बसल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे लायगरच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विजयला मोठया अपयशाला सामोरं (Bollywood News) जावं लागलं आहे. त्याच्या या चित्रपटाचे रिव्ह्यु टोकाचे आहेत. लायगर पाहून आपण नाखूश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासगळ्यात आयएमडीबीच्या रेटिंगनं तर त्या चित्रपटाचे धिंडवडे काढले आहेत.

काही दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यात बड्या बड्या कलाकारांना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, अक्षय कुमार यांच्या चित्रपट दणकून आपटले आहेत. या स्टार्सनं असा कधीही विचार केला नव्हता. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या चित्रपटांचा झालेला नकारात्मक प्रचार हा त्यांना भोवला आहे. विजयनं देखील थिएटरचालकांच्या विरोधात घेतलेली भूमिका त्याला नडली आहे. यासगळ्याचा परिणाम त्याच्या चित्रपटावर झाला आहे. लायगर फ्लॉप झाल्याचे अनेक समीक्षक, चित्रपट अभ्यासक यांनी म्हटले आहे. आयएमडीबीच्या रेटिंग अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आयएमडीबीनं सध्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे रेटिंग शेयर केले आहे. त्यात त्यांनी लायगरला दहापैकी केवळ 1.7 असं रेटिंग देण्यात समाधान मानले आहे. लायगरची स्टारकास्ट, त्याची स्टोरी, संवाद यासगळ्या पातळीवर या चित्रपटानं प्रेक्षकांची निराशा केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. विजयचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन वगळता लायगरमध्ये फारसे काही पाहण्यासारखे नाही अशी प्रेक्षकांची भावना आहे. आयएमडीबीनं म्हटल्यानुसार, लायगर हा आतापर्यतचा सर्वात बोगस चित्रपट असल्याचे म्हटले आहे. एका युझर्सनं दहापैकी 1 गुणं देणं यापेक्षा आणखी काय वेगळी प्रतिक्रिया असू शकते असे म्हटले आहे.

हेही वाचा: Liger Movie: 'जास्त चरबी चढलीय का?' थिएटरचालक विजयवर संतापले

आयएमडीबीनं आमिरच्या लाल सिंग चढ्ढाला 5. अक्षय कुमारच्या रक्षाबंधनला 4.6 तर तापसीच्या दोबाराला 2.9 असं रेटिंग दिलं आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरच्या समशेरा आयएमडीबीनं 4.9 असं रेटिंग दिलं आहे. यावरुन यंदाच्या वर्षी बॉलीवूडच्या चित्रपटांचा परफॉर्मन्स कसा राहिला आहे याची माहिती मिळते.

हेही वाचा: Liger: 'लायगर 200 कोटींची कमाई करणार', विजयला बतावणी भोवली!

Web Title: Liger Flop Imdb Rating 17 Actor Vijay Devara Konda Ananya Panday Users Trolled Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..