मनाला रिफ्रेश करण्यासाठी पाहा 'या' हलक्या-फुलक्या वेब सीरिज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon prime series

मनाला रिफ्रेश करण्यासाठी पाहा 'या' हलक्या-फुलक्या वेब सीरिज

सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंता, काळजीचं वातावरण आहे. दिवसभर कोरोनाच्या नकारात्मक बातम्या वाचून वैतागला असाल तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही हलक्या फुलक्या सीरिज पाहण्याचा पर्याय काही वाईट नाही. 'अॅमेझॉन प्राइम'वरील Amazon Prime अशाच पाच हलक्या फुलक्या, हसवणाऱ्या वेब सीरिज कोणत्या आहेत, ते पाहुयात.. (Light hearted web series and shows that can be watched on Amazon Prime Video)

१- फोर मोअर शॉट्स प्लीज (सिझन १ आणि २)

वकील, पत्रकार, जिम ट्रेनर आणि श्रीमंताघरची लेक अशा चौघींची ही कथा आहे. या चौघी अपघाताने एकेदिवशी एका पबमध्ये भेटतात. स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चौघींना काय काय अडचणी येतात हे यात मांडण्यात प्रयत्न केला आहे.

२- पंचायत

'हॉस्टेल डेज', 'कोटा फॅक्ट्री' यांसारख्या सीरिजचे निर्माते TVF यांनी 'पंचायत'ची निर्मिती केली आहे. इंजिनीअरची पदवी घेतलेल्या अभिषेकची ही कथा आहे. उत्तर प्रदेशमधल्या एका खेडेगावात तो पंचायत कार्यालयात काम करण्यास येतो आणि तेथे त्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, ते यात दाखवण्यात आलं आहे.

३- LOL- हसी तो फसी

ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोनंतर लास्ट वन लाफिंग हा टीव्ही शो भारतात आला आहे. यात अर्शद वारसी, बमन इराणी, सुनील ग्रोव्हर, मल्लिका दुआ, कुशा कपिला, गौरव गेरा, सायरस ब्रोचा, सुरेश मेनन, आकाश गुप्ता, आदर मलिक, अदिती मित्तल आणि अंकिता श्रीवास्तव हे कलाकार पाहायला मिळतील. दहा जणांना सहा तासांसाठी एका रुममध्ये ठेवण्यात येतं आणि त्या दहा जणांमधील संवाद, विनोद प्रेक्षकांना अनुभवायला मिळतात.

४- चाचा विधायक है हमारे (सिझन १ आणि २)

यामध्ये जाकिर खान, व्योम शर्मा आणि कुमार वरुण यांच्या मुख्य भूमिका आहेत. जाकिर यामध्ये रोहित पाठक ऊर्फ रॉनी भैय्याची भूमिका साकारत आहे. रॉनीची स्वप्नं खूप मोठी असतात, मात्र त्याच्या हाती साधी नोकरीही नसते. अन्वर आणि क्रांती या दोन मित्रांसोबत तो सतत हिंडत असतो. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी रॉनी दररोज नवीन फंडे आजमावत असतो. त्याचीच ही खळखळून हसवणारी कथा आहे.

५- हॉस्टेल डेज

यामध्ये निखिल विजय, शुभम गौर, आदर्श गौरव आणि लव यांच्या मुख्य भूमिका आहेत. इंजिनीअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल लाइफबद्दल भाष्य करणारी ही हलकी फुलकी कथा आहे.

टॅग्स :Entertainment