काय आहे मेस्सीचं 'पुणे कनेक्शन'? मेस्सीचे आजी-आजोबा हे पुण्यात... |Lionel Messi Connection | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Mimes

Lionel Messi Memes : काय आहे मेस्सीचं 'पुणे कनेक्शन'? मेस्सीचे आजी-आजोबा हे पुण्यात...

Lionel Messi fifa 2022 social media viral mimes pune: जगभरामध्ये फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर अजुनही कायम आहे. काल अर्जेटिना आणि फ्रान्स यांच्यात फायनल झाली होती. त्यामध्ये अर्जेटिनानं चमकदार खेळ करत फ्रान्सचा पराभव केला. पेनल्टी शुट आऊटपर्यत हा सामना रंगला होता. अर्जेटिनाच्या लियोनेल मेस्सीनं केलेली खेळी ही यशस्वी झाली आहे.

अर्जेटिनाचा विजय हा भारतीयांनी देखील मोठ्या आनंदात साजरा केल्याचे दिसून आले आहे. दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, पोस्ट यामुळे नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाल्याचे दिसून आले आहे. आता तर मेस्सीवर क्रिएटिव्ह मीम्स तयार करण्याची नेटकऱ्यांमध्ये शर्यत लागली आहे. मेस्सीनं केलेला गोल भारतीयांच्या मनात खोलवर रुतून बसला आहे. कुणी मेस्सीचा जन्म हा आसाममध्ये झाल्याचे वक्तव्य केले आहे तर कुणी मेस्सी आणि पुण्याचे काय खास कनेक्शन होते हे शोधून काढले आहे.

viral social media

viral social media

social media

social media

सोशल मीडियावर मेस्सी नव्हे तर त्याचे आजी आजोबा हे पुणेकर कसे होते याविषयीची एक पोस्ट शेयर केली आहे. त्याचबरोबर आणखी एकानं मेस्सी तर डोंबिवलीकर होता असे म्हटले आहे. कित्येकांनी मेस्सी या शब्दाचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं फोड करुन सांगितला आहे. सध्या व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये मेस्सीचे पुण्याशी खूप जुने संबंध असल्याचे सांगत त्याचे स्पष्टीकरण देताना, " मेस्सीचे आज्जी आणि आजोबा पुण्यात मंथली मेस चालवायचे म्हणून अर्जेंटिना मध्ये स्थलांतरित झाल्यावर त्यांनी स्वतःचे आडनाव मेस्'सी करून घेतले. असे म्हणत पोस्ट शेयर केली आहे.

त्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. मीम्सकऱ्यांच्या सर्जनशीलतेला सलाम करावा तेवढा कमीच आहे. ती पोस्ट शेयर करताना आताच्या मेस वाल्यांसारख्या कच्च्या भाकरी खाऊ घालत नव्हते. हे विशेष....असेही म्हटले आहे. आणखी अशा एका पोस्टनं नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. त्यांना खळखळून हसवले आहे.

मेस्सी मुळचा नेतीवली, कल्याण पूर्व, जि. ठाण्याचा. श्री. म्हात्रे आणि सौ. म्हात्रे (लग्नाआधीचे नाव, चौधरी) यांचा तीन नंबरचा चिरंजीव म्हणजे आपला धडाकेबाज फुटबॉल प्लेअर लिओनेल मेस्सी. म्हात्रेचा M आणि चौधरींचा (सौ. म्हात्रे) C, याचेवरून त्याचे नाव MC ठेवण्यात आले होते. गावातील वयस्कर माणसांना MC (एमसी) असे सहज उच्चारता येत नसे म्हणून ते त्याला 'मेस्सी मेस्सी' म्हणून हाक मारत असत. तिथून त्याचे नाव 'मेस्सी' असे पडले. आणि त्याने काल अर्जेंटिना देशासाठी खेळत फुटबॉलच्या मैदानात फ्रान्सला धूळ चारत आमच्या 'नेतिवली' गावाचे नाव मोठे केले. जय मेस्सी, जै जै मेस्सी ! या पोस्टनं देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.