FRIENDS : शूटिंगदरम्यान 'फिबी' होती प्रेग्नंट; आता मुलाने पूर्ण केलं पदवीचं शिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lisa Kudrow

FRIENDS : शूटिंगदरम्यान 'फिबी' होती प्रेग्नंट; आता मुलाने पूर्ण केलं पदवीचं शिक्षण

'फ्रेंड्स' FRIENDS ही लोकप्रिय अमेरिकन मालिका माहित नाही, असं क्वचितच कोणी असेल. या मालिकेने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले आणि आता पुन्हा एकदा ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'फ्रेंड्स रियुनियन'ची FRIENDS Reunion उत्सुकता जगभरात असताना आता त्यातील कलाकारांविषयीही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या मालिकेत 'फिबी बुफे'ची Phoebe Buffay भूमिका साकारणारी अभिनेत्री लिसा कुड्रो ही त्यावेळी शूटिंगदरम्यान गर्भवती होती. तिचा मुलगा ज्युलियन मुरे स्टर्न याने नुकतंच पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. लॉस एंजिलिसच्या युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया इथून त्याने पदवी संपादित केली. (Lisa Kudrow was pregnant in real life while shooting for FRIENDS her baby is now a college graduate)

मालिकेच्या चौथ्या आणि पाचव्या सिझनमध्ये फिबीला गर्भवती दाखवण्यात आलं होतं. भाऊ फ्रँक आणि बहीण अॅलिससाठी ती 'सरोगेट मदर' होण्याचा निर्णय घेते. खऱ्या आयुष्यात लिसाने मे १९९८ मध्ये ज्युलियनला जन्म दिला. लिसाच्या पतीचं नाव मायकल स्टर्न आहे. नुकतंच लिसाने तिच्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

याच विद्यापिठातून नुकतंच शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन याने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. 'बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स, फिल्म अँड टेलिव्हिजन प्रॉडक्शन' ही पदवी आर्यन खानने संपादित केली.

'फ्रेंड्स रियुनियन'चा एपिसोड येत्या २७ मे रोजी एचबीओ मॅक्स HBO Max वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या एपिसोडमध्ये फिबीसोबत तिचे इतर पाच सहकलाकारसुद्धा पहायला मिळतील. या एपिसोडचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

loading image
go to top