लाॅकडाऊननंतर पीव्हीआर सिनेमा उचलणार मोठे पाऊल

संतोष भिंगार्डे
सोमवार, 6 एप्रिल 2020

दोन सीटमध्ये एका सीट एवढं अंतर असेल. हे बदल काही दिवसांसाठीच आहेत. त्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहे पहिल्यासारखीच दिसतील,

लाॅकडाऊननंतर पीव्हीआर 
सिनेमा उचलणार मोठे पाऊल
 
सकाळ न्यूज नेटवर्क 
मुंबई, ता. ६ ः लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहांना काही दिवसांसाठी टाळं लागलं आहे. कोरोना विषाणूबाबात खबरदारीचा उपाय म्हणून चित्रपटगृहांबरोबर नाट्यगृहही बंद आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर चित्रपटगृहांमधील सोशल डिस्टंसिंगसाठी पीव्हीआर
सिनेमाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही काही दिवसांसाठी सोशल डिस्टंसिंग पाळणंही तितकंच गरजेचं आहे. सोशल डिस्टंसिंगचा विचार करूनच लॉकडाऊननंतर काही दिवसांसाठी चित्रपटगृहांमधील आसनव्यवस्था बदलण्याचा निर्णय पीव्हीआर सिनेमाने घेतला आहे.
काही दिवसांनी चित्रपटगृह सुरू होतील. पण चित्रपटगृहांमधील सीट एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यामुळे सीटवर हात ठेवताना प्रेक्षकांचा एकमेकांना स्पर्शही होऊ शकतो. सध्याची परिस्थिती पाहता चित्रपटगृहांमधील सीट आणि त्याची रचना पहिल्यासारखीच ठेवली तर सोशल डिस्टंसिंग पाळता येणार नाही. म्हणून पीव्हीआर सिनेमा आसन रचना बदलणार आहे. पीव्हीआरने याबाबत तयारीही
सुरू केली आहे.चित्रपटगृहांची रचना बदलण्याचा आम्ही जो निर्णय घेतला आहे त्याबाबत सध्या आम्ही तयारी करत आहोत. चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांशी विशेष अंतर ठेवून कसे बोलायचे याचेही प्रशिक्षण आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना देणार आहोत. तसेच दोन सीटमध्ये एका सीट
एवढं अंतर असेल. पण हे बदल काही दिवसांसाठीच आहेत. त्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहे पहिल्यासारखीच दिसतील, असे पीव्हीआर सिनेमाचे सीईओ गौतम दत्ता यांनी सांगितले. तसेच प्रेक्षकांनी सोशल डिस्टंसिंग गांभीर्याने घ्यावे यासाठी पीव्हीआर काही विशेष प्लॅनिंगही
करत आहे. 
गौतम दत्ता पुढे म्हणाले, प्रेक्षक जेव्हा चित्रपटाची तिकिटे खरेदी करतील तेव्हाच  चित्रपटगृहांमध्ये सोशल डिस्टंसिंग कसे पाळावे याबाबत माहिती आम्ही देणार आहोत. विशेष अंतर ठेवून प्रेक्षकांना एकमेकांशी बोलावं लागणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही
हे करत आहोत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळणं फार महत्त्वाचं आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याची शिस्त प्रत्येकाला लागलीच पाहिजे. त्यामुळे पीव्हीआरने घेतलेला निर्णयही अगदी योग्य आहे. 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lokdownnantar pvr cinema uchalnar mothe paul

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: