Lokesh Kanagaraj: 'कैथी', 'विक्रम' च्या दिग्दर्शकानं सोशल मीडियाला ठोकला रामराम! काय आहे कारण?

साऊथ चित्रपट विश्वामध्ये आपल्या चित्रपटांनी खळबळ उडवून देणाऱ्या लोकेश कनगराजच्या त्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
Lokesh Kanagaraj South Director Break Form Social Media
Lokesh Kanagaraj South Director Break Form Social Media esakal

Lokesh Kanagaraj South Director Break Form Social Media : साऊथ चित्रपट विश्वामध्ये आपल्या चित्रपटांनी खळबळ उडवून देणाऱ्या लोकेश कनगराजच्या त्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. या प्रख्यात दिग्दर्शकानं यापुढील काळात आपण सोशल मीडियाला अलविदा करणार असल्याचे म्हटले आहे.

दिग्दर्शक लोकेशच्या या निर्णयानं मात्र चाहत्यांची मोठी निराशा झाल्याचे दिसून आले आहे. कैथी, विक्रम, लिओ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करुन लोकप्रिय झालेल्या लोकेशचा चाहतावर्ग मोठा आहे. कमी वयातच लोकप्रियतेचा वेगळा विक्रम त्यानं आपल्या नावावर केला आहे. प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांना घेऊन केलेल्या विक्रम या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

साऊथमधील प्रभावी दिग्दर्शकांच्या यादीत लोकेशच्या नावाचा समावेश होतो. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रकारचे सिनेमॅटिक प्रेझेंटेशन करण्याची भूमिका लोकेशनं सुरु केली. त्यासाठी तो ओळखलाही जातो. त्याच्या सोशल मीडियाच्या ब्रेक घेण्याच्या बातमीनं अनेकांना धक्का दिला आहे. खरं तर यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियातून ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानला देखील सातत्यानं सोशल मीडियावर सक्रिय राहणे पसंत नाही. त्यामुळे तो सोशल मीडियाच्या अपडेट पासून लांब आहे. हिंदी, मराठी, मनोरंजन विश्वातील कित्येक सेलिब्रेटी हे सोशल मीडियापासून दूर राहतात. त्यात आता साऊथच्या लोकेश कनगराजची भर पडली आहे.

लोकेशनं एक प्रेस नोट प्रसिद्ध केली असून त्यामध्ये त्यानं यापुढील काळात आपण सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म आणि मोबाईल यापासून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले आहे. आपल्याला आगामी काळात प्रोजेक्टवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचे त्यानं हे म्हटले आहे. तो थलायवर १७१ नावाच्या चित्रपटावर काम करतो आहे.

Lokesh Kanagaraj South Director Break Form Social Media
Suhana Khan The Archies : 'सुहानानं अ‍ॅक्टिंग केली असं कसं म्हणायचं'? शाहरुखच्या लेकीची नेटकऱ्यांनी घेतली शाळा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com