Lokmanya: सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? पुन्हा येतायत 'लोकमान्य'..

'झी' मराठीवर पुन्हा एकदा उलगडणार लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य इतिहास..
 lokmanya zee marathi new serial on bal gangadhar tilak cast kshitish date and spruha joshi
lokmanya zee marathi new serial on bal gangadhar tilak cast kshitish date and spruha joshisakal

lokmanya: गेली काही दिवस मुंबई भरात 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असे मोठाले पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे सध्याच्या राजकीय गोंधळाच्या वातावरणात हे पोस्टर कुणी लावले आणि नेमका अर्थ काय अशा चर्चाना उधाण आले होते. मात्रा आता त्याचा उलगडा झाला आहे.

( lokmanya zee marathi new serial on bal gangadhar tilak cast kshitish date and spruha joshi)

 lokmanya zee marathi new serial on bal gangadhar tilak cast kshitish date and spruha joshi
TMKOC: कृपया अफवा पसरवू नका.. अपघाताच्या बातमीनंतर चंपक चाचांनीच सांगितलं सत्य

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल करत इंग्रज सरकारला धारेवर धरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यावर नवी मालिका झी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. बदल घडत नाही तो घडवावा लागतो, या दिशेने सध्या झी मराठी वाहिनीचा प्रवास सुरू आहे. आणि हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहे, ते लोकमान्य टिळक या दृष्टीकोनातून समजून घेणं, जाणून घेणं आजच्या काळाशी अगदी सुसंगत आहे. म्हणूनच झी मराठी वाहिनी 'लोकमान्य' ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा घेऊन आलं आहे.

 lokmanya zee marathi new serial on bal gangadhar tilak cast kshitish date and spruha joshi
Hemangi Kavi: सुश्मिता सारख्या लफडेबाज बाईला दुर्गा.. चाहत्याची कमेंट, हेमंगीचे सडेतोड उत्तर

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान शाळकरी वयात असल्यापासून आपल्या अंगी भिनलेला आहे. लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास आपल्याला तोंडपाठ आहे. टिळकांचं राष्ट्रप्रेम, त्यांचं करारी व्यक्तिमत्त्व आपल्या प्रत्येकाच्या मनात वसलेलं आहे. त्यामुळे आजही लोकमान्य असा शब्द जरी उच्चारला तरी टिळकांचा प्रभावी इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांच्या प्रभावी कृतीतून त्यांनी घालून दिलेला एकत्र येण्याचा वसा आपण आजही जपतो आहोत.

लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता आजही आहे. आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडता येण्याच्या कसोटी काळात सध्या आपण आहोत. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्त्वशैली आपल्याकडेही असावी, असे वाटण्याचा हा काळ आहे, म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ह्या मालिकेचं लेखन केलं आहे आशुतोष परांडकर यांनी तर स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्मिते आहेत. या मालिकेतून अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहेत. ही मालिका २१ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com