महेश भट्टने केले अनेकांचे आयुष्य उद्धवस्त; अभिनेत्री लेविनाचा आरोप

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 24 October 2020

महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, असं लविना म्हणाली. इतक्यावरच ती थांबलेली नाही ती म्हणते, “ सगळी इंडस्ट्री तोच चालवतो आणि जर तुम्ही नियम मोडले तर ते तुमचं जगणं कठीण करुन टाकतात.

मुंबई - बॉलीवूडमधले प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांना त्याच्या घरातील व्यक्तीकडूनच एका मोठ्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे असून ते त्यांच्या महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी लविना लोध हिने केले आहे.

  ट्विटरवर तिने यासंबंधी एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात भट्ट यांच्यावर आरोप करुन आपण पोलिसांमध्ये तक्रार देऊनही लविना लोध हिने ट्विटरवर शेयर केलेल्या त्या व्हिडीओमध्ये खळबळजनक खुलासे केले आहे. मात्र हे करताना आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला महेश भट्ट जबाबदार असतील असे तिने म्हटले आहे. या आरोपात तिने आपल्या पतीलाही जबाबदार धरल आहे. माझा पती सुमित ड्रग्स आणि मुली सप्लाय करतो. असा आरोप तिने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांवर होणारे आरोप समोर आले आहेत. यासगळ्या परिस्थितीला सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा संदर्भ आहे.

त्या प्रकरणाच्या तपासातून अनेक बाबी उघड झाल्या आहेत.  दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर झालेल्या आरोपाने पुन्हा एकदा बॉलीवूड चर्चेत आले आहे. यापूर्वी अनेकांनी महेश भट्ट यांच्यावर काही आरोप केल्याचं पाहायला मिळालं. आता महेश भट्ट यांच्या सुनेने लविना लोध हिने त्यांच्यावर आणि तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहे. ती महेश भट्ट कलाविश्वातील डॉन आहे, त्याच्या एका फोनमुळे कलाविश्वातील सगळं चित्र पालटून जातं असं तिने म्हटलं आहे. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “माझं नाव लविना लोध आहे. हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझं लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झालं. मी आता घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत.

यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, असं लविना म्हणाली. इतक्यावरच ती थांबलेली नाही ती म्हणते, “ सगळी इंडस्ट्री तोच चालवतो आणि जर तुम्ही नियम मोडले तर ते तुमचं जगणं कठीण करुन टाकतात. महेश भट्टने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले आहेत. त्यांनी अनेक कलाकार, दिग्दर्शक, कंपोजर्स यांच्याकडून काम काढून घेतली आहेत. ते एक फोन करतात आणि समोरच्याचं काम काढून घेतात.

विशेष म्हणजे हे कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. अशा प्रकारे त्यांनी अनेकांचं आयुष्य़ बर्बाद केलं आहे. त्यांच्याविरुद्ध मी तक्रार दाखल केल्यानंतर ते सातत्याने मला त्रास देत आहेत. मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एकतर मी त्यांच्याविरोधात एनसी करायला गेले तर कोणत्याच पोलीस ठाण्यात एनसी नोंदवून घेतली जात नाही, आणि जर का ती घेतली तर कोणीही त्यावर काहीच कारवाई करत नाही. जर पुढे जाऊन माझ्यासोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत काही कमी जास्त झालं तर त्याला महेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सेहगल, कुमकुम सेहगल हे जबाबदार असतील”.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Luviena Lodh shared a video on Instagram and alligations on Mahesh Bhatt