'मेड इन चायना'चा ट्रेलर रिलीज; राजकुमार राव करणार 'इंडिया का जुगाड'

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

राजकुमार रावचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कॉमेडीने भरपूर असा हा चित्रपट असणार आहे.

मुंबई : राजकुमार रावचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. भरपूर कॉमेडी या चित्रपटामध्ये असणार आहे. नक्कीच हा सिनेमा अत्यंत मजेशीर असणार आहे कारण बोमन ईराणी, परेश रावल, मौनी रॉय, सुमित व्यास अशी दमदार कास्ट यामध्य़े आहे. 

राजकुमार या चित्रपटामध्ये अहमदनगरच्या एका लहान व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. गुजराती व्यापारी 'रघू' म्हणजेच राजकुमार याच्या संघर्षावर आधारीत ही कथा आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. राजकुमार यामध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये दिसून येत आहे. त्य़ाला ओळखणे जवळपास कठीणच झाले आहे. सिनेमासाठी त्याने वजन खूप वाढवल्याचं लक्षात येतं. एवढचं काय तर तो चक्क पोट सुटलेल्या अवस्थेत दिसतोय. य़ाआधी तो अशा लूकमध्ये कधीच दिसून आला नाही. चित्रपटाचं दिग्दर्शन मिखिल मुसाले यांनी केलं आहे. 

राजकुमार रावसोबत मौनी रॉय त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच ही जोडी बॉक्सऑफिसवर दिसणार आहे. मौनी रॉय याआधी अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटामध्ये दिसली होती तर, राजकुमार कंगणा रणावतसोबत 'जजमेंटल है क्या' मध्ये दिसला होता. 'मेड इन चायना' येत्या 24 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Made in China trailer Rajkummar Rao has the perfect Jugaad for every struggling entrepreneur