
Butterfly Movie: कलाकारांची तगडी फौज घेऊन आलीय मधुरा वेलणकर.. येतोय भारी फिलिंग देणारा 'बटरफ्लाय'
madhura welankar: नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठीतील एक दिग्गज अभिनेत्री मधुरा वेलणकर सध्या बरीच चर्चेत आहे. नुकतीच तिची सोनी मराठी वाहिनीवरील 'तुमची मुलगी काय करते' ही मालिका प्रचंड गाजली. त्यानंतर लगेचच तिने 'मधुरव' या तिच्या नव्या नाट्यप्रयोगाची घोषणा केली. अशातच मधुराने आता नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अत्यंत तगडी स्टारकास्ट घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'बटरफ्लाय' असे या चित्रपटाचे नाव असून नुकतीच याची घोषणा मधुराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुराची मोठी बहीण मीरा वेलणकर हिने केले असून मधुरा तिचे पती अभिजीत साटम, वडील प्रदीप वेलणकर, महेश मांजरेकर, सोनिया परचुरे, राधा धारणे अशी दिग्गज नट मंडळी या सिनेमात आहेत.
'भारी फिलिंग देणारा आणि आयुष्याला लख लख लायटिंग करणारा सिनेमा' अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. नात्यांची नवी बाजू उलगडणारा हा चित्रपट येत्या 5 मे 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.