Madhurani Prabhulkar
Madhurani PrabhulkarGoogle

Exclusive:-'आई कुठे काय करते' या प्रसिद्ध मालिकेचा असा होणार शेवट...

'ईसकाळला' दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत स्वत: मधुराणी प्रभुलकरने सांगितले की,
Published on

नाटक-सिनेमातनं फारसं काम नं केलेली पण आता 'आई कुठे काय करते' या मालिकेतली 'अरुंधती' बनून थेट प्रेक्षकांच्या ह्रदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar). 'ईसकाळला' दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत तिनं स्वतःच मालिकेचा शेवट कसा होईल याबाबत खुलासा केला आहे. या मुलाखतीत मधुराणीनं 'स्त्रीला मित्र असावेत का?' या प्रश्नावर उत्तर देताना अगदी बिनधास्त आपलं मत मांडलं आहे. ती म्हणाली,''हो स्त्रीला मित्र असावेत. आणि मी तर म्हणेन एक नाही तर अगदी भरपूर मित्र असावेत. उलट मैत्रिणींपेक्षा जास्त मित्र स्त्रीला असावेत. कारण एक स्त्री दुस-या स्त्रीशी ज्या विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधू शकत नाही त्याच विषयावर ती अगदी बिनधास्तपणे एका पुरुषाशी मात्र बोलू शकते असं मला वाटतं. आणि असे अनेक विषय आहेत जिथे एक पुरुष मित्र स्त्रीला अधिक जास्त समजून घेऊ शकतो''.

Madhurani Prabhulkar
शाहिद कपूरच्या ओठांना पडले तब्बल २५ टाके;रक्ताने माखलेला फोटो व्हायरल

मधुराणी प्रभुलकरनं नाटक-सिनेमातनं फार कमी काम केलं असलं तरी तिचं 'कवितेच पान' आणि 'रंगपंढरी' असे दोन कार्यक्रम सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध आहेत. 'कवितेचं पान' या कार्यक्रमातनं तिनं गुगलवर मराठी कवितांचे अनेकं संदर्भ सहज उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमात तिनं अनेक कवींना बोलतं केलं. अनेक दुर्मिळ काव्यसंपदा लोकांना उपलब्ध करून दिली. तर 'रंगपंढरी' कार्यक्रमातनं तिनं नाट्यसंस्कृतीचं सुंदर दालन लोकांसाठी खुलं करून दिलं. हे सगळं करताना इतक्या वर्षात 'तुला नाटक-मालिका-सिनेमा का करावासा वाटला नाही?' या प्रश्नावर उत्तर देताना मात्र मधुराणी म्हणाली, ''काही वर्षांपूर्वी मालिका-सिनेमांमधनं दाखवली जाणारी पुरुषप्रधान संस्कृती मला पटत नव्हती. किंवा दाग-दागिने घालून छान छान साड्या घालून किचनमध्ये काम करणारी स्त्री मला रुचत नव्हती. त्यामुळे मी ठरवून मालिका-सिनेमांपासनं दूर राहिली. पण अरुंधती साकारल्यानंतर वाटतंय मी खूप काही मिस केलं. पण आता खूप काम करायचंय. नाटक करायचंय''. असंही तिनं आवर्जुन सांगितलं.

Marathi News Esakal
www.esakal.com