Madhuri Dixit Net Worth: दौलत है, शौहरत है.. पण नेट वर्थ किती? माधुरी आहे 'इतक्या' करोडोंची मालकीण! वयाच्या पन्नाशीतही कमाई सुरुच..

Madhuri Dixit Net Worth:
Madhuri Dixit Net Worth:Esakal

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आज तिचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिचे चाहते अन् सेलेब्सही तिचं अभिनंदन करत आहेत. माधुरी दीक्षित इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे, तिने तिच्या करिअरमध्ये 70 हून अधिक चित्रपट केले आहेत.

Madhuri Dixit Net Worth:
Rajkummar Rao: राज आता पाळणा केव्हा हलणार, शहनाजच्या 'त्या' प्रश्नावर अभिनेत्याचं कडक उत्तर व्हिडिओ व्हायरल..

माधुरी दीक्षितचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. अभिनेत्रीने 1984 मध्ये आलेल्या 'अबोध' या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

माधुरीने तिच्या करिअरमध्ये 'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अशा परिस्थितीत माधुरी दीक्षितची नेट वर्थ किती आहे, असा प्रश्न सहज पडतो. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त ती किती संपत्तीची मालकिन आहे हे जाणुन घेवुया...

Madhuri Dixit Net Worth:
The Kerala Story BO: अदाच्या द केरळ स्टोरीनं शाहरुखच्या पठाणला केलं धोबीपछाड!कमाईचे आकडे भिडले गगनाला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षित नेनेची एकूण संपत्ती $35 दशलक्ष आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर तिची एकूण संपत्ती 264 कोटी रुपये होईल. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वासनुसार, ती एका चित्रपटासाठी सुमारे 4-5 कोटी रुपये घेते तसचं.

माधुरी ब्रँड प्रमोशनमधून देखील भरपूर कमाई करते. इतकंच नाही तर अभिनेत्री 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली आहे.

एका रिअॅलिटी शोला जज करण्यासाठी ती एका सीझनसाठी 24-25 कोटी रुपये घेते. यासोबतच ती अनेक ब्रँड्सना एंडोर्स करते. माधुरी एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी सुमारे 8 कोटी रुपये घेते.

Madhuri Dixit Net Worth:
Parineeti-Raghav: "देवावरचा विश्वास...", लेकीच्या साखपुड्यानंतर रिना चोप्रा भावुक!

माधुरीला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. तिच्याकडे व्हाइट ऑडी, टोयोटा इनोवा क्रिस्टल, रोल्स रॉयस आणि स्कोडा रैपिड अशी अनेक वाहने आहेत.

माधुरी दीक्षितची 'डान्स विथ माधुरी' नावाची ऑनलाइन डान्स अकादमी आहे. यातून ती भरपूर पैसे मिळतात. याशिवाय माधुरी RNM मूव्हिंग पिक्चर्सची सह-संस्थापक देखील आहे. पती श्रीराम नेने यांच्यासोबत तिने ही कंपनी सुरू केली. माधुरीने एका स्टार्ट-अप कंपनीतही गुंतवणूक केली आहे. तिचे नाव GOQii आहे. ती फिटनेस तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com