IFFI Awards 2023 : 'धकधक गर्ल' माधुरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, यंदाच्या 'इफ्फी महोत्सवात' होणार मोठा गौरव!

प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Madhuri Dixit got Special Recognition for Contribution
Madhuri Dixit got Special Recognition for Contribution

Madhuri Dixit got Special Recognition for Contribution : प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता माधुरीला तिच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी गौरविले जाणार आहे. ५४ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामधील महोत्सवामध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे.

केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी एक्स वर पोस्ट करत याविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला ती गोष्ट सांगताना खूप आनंद होतो आहे की, प्रतिभाशाली आणि आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या कौतुकाचा विषय असलेली माधुरीचा आम्हाला गौरव करण्याची संधी मिळते आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

माधुरीनं भारतीय सिनेमा क्षेत्रात जे योगदान दिले आहे यासाठी आम्ही तिचा विशेष सन्मान करतो आहोत. यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव समारंभ होणार आहे. असेही त्या व्टिटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ माधुरीनं तिच्या अभिनयानं, सौंदर्यानं अन् नृत्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक प्रभावशाली अभिनेत्रींमध्ये माधुरीचे नाव घेतले जाते. आजवर माधुरीनं विविध पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवली असून आता तिच्या शिरपेचात आणखी एका पुरस्काराची भर पडणार आहे.

Madhuri Dixit got Special Recognition for Contribution
Shah Rukh Viral Video : दिल जीत लिया ! आशाताईंसाठी केलेल्या किंग खानच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

भारतीय फिल्म महोत्सवाला होतेय सुरुवात...

भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवा (आयएफएफआय) च्या पाचव्या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यातील पणजीममध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, नुसरत भरुचा, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, माधुरी दीक्षित, शाहिद कपूर आणि श्रिया सरन आदी सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com