esakal | माधुरी सांगतेय मास्क वापरण्याची योग्य पद्धत; पाहा Video

बोलून बातमी शोधा

Madhuri Dixit
माधुरी सांगतेय मास्क वापरण्याची योग्य पद्धत; पाहा Video
sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देत आहेत. बऱ्या वेळा नागरिक मास्क चुकीच्या पद्धतीने घालतात. अशा व्यक्तींना माधुरीने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून मास्क घालण्याची योग्य पद्धत शिकवली आहे. माधुरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या डान्सचे व्हिडीओ तसेच फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर ती नेहमी शेअर करत असते. माधुरीने नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती मास्क घालण्याची योग्य पद्धत सांगत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला ती मास्क घालण्याच्या चुकीच्या पद्धती कोणत्या ते सांगते. हनुवटीवर, कपाळावर, फक्त तोंडावर या सर्व मास्क घालण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत असे माधुरीने सांगितले आहे. नाक तोंड पूर्ण कव्हर करून मास्क घालणे ही पद्धत योग्य आहे असे माधुरीने या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना सांगितले. तिने मास्क घालण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक या व्हिडीओमध्ये करून दाखवले आहे. या व्हिडीओला माधुरीने प्रसिद्ध व्हिडीओ गेम मारिओचे संगीत दिले आहे. ‘सुरक्षित राहा' असे कॅप्शन देत माधुरीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडीओला 35 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर अनेक जणांनी कमेंट करून तिचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : 'सत्य खाडकन् थोडाबीत मारल्यासारखं समोर आलं'; फुलवा खामकर भावूक

माधुरी सध्या ‘डान्स दिवाने’ या शोचे परीक्षण करत आहे. या शोमध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांसोबत डान्स करतानाचे व्हिडीओ माधुरी सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपूर्वी नोरा फतेही सोबत ‘मेरा पिया घर आया’ आणि ‘एक दो तिन’ या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ माधुरीने शेअर केला होता.