
मुंबई- बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने सोशल मिडीयावर तिचा जुना फोटो शेअर केला आहे...तिचा हा फोटो पाहुनंच तिचे चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत मात्र हा फोटो शेअर करण्यामागे एक खास कारण आहे..या फोटोसोबतंच माधुरीने या फोटोला दिलेलं कॅप्शन वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की तीने हा फोटो शेअर करण्यामागचं खरं कारण काय आहे?
माधुरीने इंस्टाग्रामवर तिचा एक ब्लॅक एँड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे..या फोटोमध्ये ती कॅमेरात न पाहता कुठेतरी लांब पाहत आहे..हा फोटो पोस्ट करताना माधुरीने लिहिलंय, 'नजर रस्त्यांवर पण पाय घराच्या आत'..या कॅप्शनमधून माधुरीने लोकांना कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी घरातंच राहण्याचं आवाहन केलं आहे...माधुरीच्या या फोटोला आत्तापर्यंत अडीच लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे..
माधुरी आणि तिचे पती श्रीराम यांनी या महिनाच्या सुरुवातीलाच कोविड-१९च्या या संकटासोबत दोन हात करण्यासाठी 'पीएम केअर्स फंड' आणि 'महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी' साठी याोगदान केल्याचं जाहीर केलं होतं..
माधुरीने नुकताच पती श्रीराम नेनेंसोबत एक फोटो शेअर केला आहे..या फोटोमध्ये माधुरी, पती श्रीराम नेने आणि त्यांचा कुत्रा कारमेलो हे तिघेही खिडकीबाहेर पाहताना दिसत आहेत..हा फोटो पोस्ट करताना माधुरीने लिहिलंय, 'आम्ही कारमेलोसोबत पक्षी पाहतोय..'
यासोबतंच माधुरी सध्या या लॉकडाऊनच्या काळात लोकांना ऑनलाईन डान्सचे धडे देत आहे..माधुरी कथ्थक सम्राट बिरजु महाराज आणि सरोज खान, टेरेंस लुईस आणि रेमो डिसुझा सारख्या कोरिग्राफर्ससोबत मिळून डान्स विथ माधुरी डॉट कॉमवर लोकांना विनामुल्य डान्स शिकवत आहे..
madhuri dixit shared an old photo with this big message about lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.