
मुंबई- महाभारत ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड गाजत आहे. ज्यांचं बालपण महाभारत ही मालिका पाहून गेलं त्यांच्या जुन्या आठवणीही आता ताज्या होत आहेत. एकेकाळी ही मालिका लागली की रस्ते सामसुम असायचे. लोक ही मालिका कधीही चुकवत नसत. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती त्या काळात अर्थात बत्तीस वर्षांपूर्वी. या मालिकेतील जवळपास सगळ्याच कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली होती आणि एका रात्रीत हे सगळे कलाकार त्या काळात प्रकाशझोतात आले.. या मालिकेतील कृष्णाची भूमिका तर माईलस्टोन ठरली आणि ती भूमिका साकारली अभिनेता नितीश भारद्वाज यांनी..आता महाभारतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे..महाभारतातील कृष्ण म्हणजेच अभिनेते नितीश भारद्वाज यांनी इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे आणि आता ते दररोज एक व्हिडिओही पोस्ट करतायेत.
नितीश यांनी शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओची खासियत म्हणजे त्यांनी यात नितीश यांनी एक चमत्काराबद्दल सांगितलं आहे..नितीश यांनी महाभारताशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता..हा व्हिडिओ ३५ लाख लोकांनी पाहिला आहे..या व्हिडिओला 'ऑनलाईन फॅमिलीने' दिलेला हा प्रतिसाद पाहून त्यांनी ते कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं आहे..याबरोबरंच नितीश लवकरंच ट्वीटर आणि युट्युबवर येणार असल्याची माहितीही या व्हिडिओमधून दिली आहे..
नितीश यांनी कृष्णाची भूमिका साकारल्यानंतर त्यांना खूप साऱ्या भूमिकांच्या ऑफर्स यायला सुरुवात झाली. मग मालिका, चित्रपट असं नितीश करत गेले. हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. 'केदारनाथ', 'मोहेंजोदारो' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तर 'तुझी माझी जमली जोडी', 'नशीबवान', 'पसंत आहे मुलगी' या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिका करत असताना त्याने पितृऋण नावाचा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला.
आता नितीश पुन्हा एकदा चर्चेत आले होते ते 'समांतर' या वेबसीरिजमुळे...काही दिवसांपूर्वीच सतिश राजवाडे दिग्दर्शित ही वेबसीरिज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली. स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असणाऱ्या या वेबसीरिजला लाखोनी व्ह्यूज मिळाले. यामध्ये नितीश यांनी चक्रपाणी ही भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका वेबविश्वात प्रचंड चर्चेचा विषय ठरली.
mahabharat sri krishna actor nitish bharadwaj makes instagram debut and share video
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.