'मेजर' चित्रपट पाहण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा; कारणही खास..

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित असलेल्या 'मेजर' चित्रपटात आदिवी शेष आणि सई मांजरेकर मुख्य भूमिकेत आहेत.
Maharashtra Chief Minister Uddhav  Thackeray speaks about Major Movie
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray speaks about Major MovieGoogle
Updated on

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी 'मेजर'(Major) च्या टीमचे अभिनंदन केले आणि त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सिनेमाला रिलीज नंतर मिळालेलं प्रचंड यश आणि समीक्षकांच्या प्रशंसे सोबतच 'मेजर' ने जगभरात 55 कोटी रुपयांची कमाई केली. आदिवी शेष आणि सई मांजरेकर यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. या सिनेमाच्या संपूर्ण टीमनं मुख्यमंत्र्याची विशेष भेट घेतली आहे.(Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray speaks about 'Major' Movie)

Maharashtra Chief Minister Uddhav  Thackeray speaks about Major Movie
'सिद्धांत कपूरला अटक करण्याऐवजी जर...' लव सिन्हाचा तपास अधिकाऱ्यांना सल्ला

यावळी आदिवीने मेजर संदीप उन्नीकृष्णन फंडाची घोषणा केली, जो केवळ दिवंगत मेजरचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत नाही, तर देशभरातील CDS आणि NDA इच्छुकांना मदत करण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून करणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटी दरम्यान, आदिवी यांनी मेजर संदीप उन्नीकृष्णन फंडाविषयी सविस्तर चर्चा केली, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. एवढेच नाही तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाकारांचे अशा पद्धतीच्या सिनेमात काम करण्यासाठी कौतुक केले आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या अशा महत्त्वाच्या आणि समर्पक विषयावर चित्रपट बनवल्याबद्दल टीमचे अभिनंदन केले.

Maharashtra Chief Minister Uddhav  Thackeray speaks about Major Movie
Siddhant Kapoor: पार्टीत लपवलेले गांजा,MDMA?; DCP चा मोठा खुलासा

मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना चित्रपटाच्या टीमला खूप आनंद झाला, यावेळी काही जणांनी 26/11 च्या दुर्दैवी हल्ल्यादरम्यान अनुभवलेले त्यांचे वैयक्तिक अनुभव देखील शेअर केले. चित्रपटाची टीम लवकरच मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबासाठी स्क्रीनिंगची व्यवस्था करणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी आता सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Maharashtra Chief Minister Uddhav  Thackeray speaks about Major Movie
'माझी मुलं गे किंवा लेस्बियन..' शमा सिकंदर पुढे जे बोलली त्याला मोठं मन हवं

आपल्या सोशल मीडियावर याचा संदर्भ देत, आदिवी यांनी लिहिले, “महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची अविश्वसनीय संधी. त्यांनी संरक्षण इच्छुकांसाठी आमच्या प्रमुख वचन निधीसाठी पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले. तो एक अविश्वसनीय क्षण होता. आमच्या चित्रपटाबद्दल अप्रतिम शब्दांबद्दल धन्यवाद सर. येत्या काही दिवसांत आम्ही संपूर्ण कुटुंबाला हा चित्रपट दाखवू. श्री @adityathackeray यांनाही भेटून आनंद झाला. #महेशमांजरेकर जी आमच्या प्रयत्नांना सेतू बनवल्याबद्दल धन्यवाद :)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com