महाराष्ट्रात शूटिंगला नियम, अटींसह मिळणार परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात शूटिंगला नियम, अटींसह मिळणार परवानगी

महाराष्ट्रात शूटिंगला नियम, अटींसह मिळणार परवानगी

जवळपास गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेल्या महाराष्ट्रातील चित्रीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी गुरुवारी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी चर्चा केली होती. राज्यात चित्रीकरण सुरू करण्याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. दिलेल्या आश्वासनानुसार, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर आता नियम आणि अटींसह राज्यात शूटिंगसाठी परवागनी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी प्रत्येक निर्मात्यांना आपल्या शूटिंगची आणि सेटवर बायो बबल Bio Bubble कसं निर्माण करणार याची माहिती द्यावी लागणार आहे. (maharashtra govt to issue permission for shooting in state on certain conditions )

चित्रीकरण कुठे करणार, किती दिवस करणार, सेटवर किती जण उपस्थित असणार, त्यांची राहण्याची व्यवस्था कशी करणार या सर्वांची माहिती निर्मात्यांना द्यावी लागणार आहे.

राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मांडण्यात आल्या होत्या.

loading image
go to top