Abhijit Bichkule: 'शेवटी मलाच जावं लागेल म्हणत...' महाराष्ट्र कर्नाटक वादात आता बिग बॉसची एंट्री! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhijit Bichkule

Abhijit Bichkule: 'शेवटी मलाच जावं लागेल म्हणत...' महाराष्ट्र कर्नाटक वादात आता बिग बॉसची एंट्री!

Maharashtra Karnataka border issue abhijeet : राज्यात सध्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमवाद चांगला चर्चेत आला आहे. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटल्याचे दिसून आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नानं राज्यातील राजकीय घडामोडींवरही संमिश्र परिणाम झाले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कर्नाटकच्या बसेसला काळे फासण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.

आता यासगळ्यात टीव्ही मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी आणि बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेनं नेहमी प्रमाणे प्रतिक्रिया देत लक्ष वेधून घेतले आहे. शेवटी मलाच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न वादात लक्ष घालावे लागेल. अशी प्रतिक्रिया देत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नेहमी आपल्या बिनधास्त आणि परखड वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बिचुकले यांच्या त्या वक्तव्याची सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून दखल घेतली जात आहे. भाजपमधल्या काही लोकांना पंतप्रधानांचं स्वप्न पडलं असून ते आता मोदींना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा मोदींना सल्ला काळजी घ्या, असं म्हणत बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना काळजीचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

हेही वाचा: Aryan Khan Bollywood Entry: पप्पा सेटवर नक्की या.... आर्यनच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

सोशल मीडियावर बिचुकलेंची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कर्नाटक सीमावाद जर लवकर थांबवला नाही तर छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहे. केवळ जाणार नाही तर तिथे आंदोलनही करणार असल्याचे त्यानं म्हटले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी बिचुकलेंना दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात केंद्रात एकाच पक्षाच सरकार आहे. त्यामुळे हा प्रश्न येत्या काळात सुटायला हवा. असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Kartik Aaryan: आईचीच इच्छा नाही कार्तिकनं लग्न करावं! काय आहे कारण?

सध्या ज्याप्रकारे सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केली जात आहे त्याकडे बिचुकलेंनी लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही ही असली वक्तव्य खपवून घेणार नाही.