Maharashtra Shaheer: शाहीर येत आहेत.. महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या नवीन पोस्टरने पाडली प्रेक्षकांना भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Shaheer , Maharashtra Shaheer news, Maharashtra Shaheer movie

Maharashtra Shaheer: शाहीर येत आहेत.. महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या नवीन पोस्टरने पाडली प्रेक्षकांना भुरळ

Maharashtra Shaheer News: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. अंकुश चौधरी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. नुकताच महाराष्ट्र शाहीर सिनेमाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

(Maharashtra Shaheer new poster out, ankush chaudhari as shaheer sabale)

डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा, आकर्षक नक्षी असलेला पांढऱ्या रंगाचा सदरा अशा पेहरावात अंकुश दिसत आहे. अंकुश समोर माईक असून तो गाण्याच्या पोझ मध्ये दिसतोय. शाहीर साबळेंच्या भूमिकेत अंकुश दमदार अंदाजात दिसतोय.

महाराष्ट्र शाहीरच्या या नवीन पोस्टरवर प्रेक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्र शाहीर सिनेमाचं नवीन पोस्टर सोबतच उद्या म्हणजे २० मार्चला सिनेमाचा पहिला टिझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याशिवाय काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र शाहीर बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय. ती म्हणजे.. सिनेमात लता मंगेशकरांची भूमिकाही असणार आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भूमिकेत मराठीतली एक आघाडीची अभिनेत्री दिसणार आहे. ती म्हणजे मृण्मयी देशपांडे.

सध्या तरी याविषयी सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.

मृण्मयीला लतादीदींच्या भूमिकेत पाहायला तिचे फॅन्स उत्सुक आहेत.मृण्मयी देशपांडे सिनेमात काम करण्यास उत्सुक आहे. यानिमिताने मृण्मयी अनेक महिन्यांनी मराठी सिनेमात झळकणार आहे.

अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावलं त्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाची निर्मिती केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांनी केली आहे.जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट अशा शाहीर साबळे यांनी रचलेली लोकप्रिय गाणी सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.