esakal |  ''लेविनाने केलेले आरोप खोटेच''; महेश भट्ट गेले कोर्टात  
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Bhatt Defamation case Against Actress Luviena Lodh

बॉलीवूडमधले प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांना त्यांच्या घरातील व्यक्तीकडूनच एका मोठ्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी लविना लोध हिने केले आहे.

 ''लेविनाने केलेले आरोप खोटेच''; महेश भट्ट गेले कोर्टात  

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक महेश भट यांच्याकडून झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळुन जीवाचे काही बरे वाईटट झाले तर त्याला ते जबाबदार असतील. अशा प्रकारचा गंभीर आरोप करणा-या अभिनेत्री लेविनाच्या विरोधात महेश भट्ट यांनी न्यायालयाचे दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी तिच्याविरोधात एक कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

बॉलीवूडमधले प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांना त्यांच्या घरातील व्यक्तीकडूनच एका मोठ्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे असून ते त्यांच्या महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी लविना लोध हिने केले आहे. तिने ट्विटरवर यासंबंधी एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात भट्ट यांच्यावर आरोप करुन आपण पोलिसांमध्ये तक्रार देऊनही  त्याची कुठलीच दखल न घेतल्याचे म्हटले आहे.

लविनाने ट्विटरवर शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये  अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. मात्र हे करताना आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला महेश भट्ट जबाबदार असतील असे तिने म्हटले आहे.या आरोपात तिने आपल्या पतीलाही जबाबदार धरले आहे. माझा पती सुमित ड्रग्स आणि मुली सप्लाय करतो. असा आरोप तिने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांवर होणारे आरोप समोर आले आहेत.

यासगळ्या परिस्थितीला सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा संदर्भ आहे. त्या प्रकरणाच्या तपासातून अनेक बाबी उघड झाल्या आहेत.  दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर झालेल्या आरोपाने पुन्हा एकदा बॉलीवूड चर्चेत आले आहे. यापूर्वी अनेकांनी महेश भट्ट यांच्यावर काही आरोप केल्याचं पाहायला मिळालं. महेश भट्ट कलाविश्वातील डॉन आहे, त्याच्या एका फोनमुळे कलाविश्वातील सगळं चित्र पालटून जातं असं तिने म्हटलं आहे. महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांनी लविनाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

भट्ट कुटुंबियांना केवळ बदनाम करण्यासाठी लविनाने हे आरोप केले आहेत असा दावा महेश भट्ट यांनी केला आहे. शिवाय तिने आपले सर्व आरोप मागे घेऊन माफी मागावी अन्यथा आमच्यासमोर कायदेशीर कारवाई करु. असाही इशारा महेश भट्ट यांनी दिला आहे. दरम्यान हे प्रकरण सध्या कोर्टात सुरु आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १६ नोव्हेंबरला होणार आहे.