esakal | पेस - भूपतीच्या 'ब्रेक अप'ची कहाणी रुपेरी पडद्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

पेस - भूपतीच्या 'ब्रेक अप'ची कहाणी रुपेरी पडद्यावर

पेस - भूपतीच्या 'ब्रेक अप'ची कहाणी रुपेरी पडद्यावर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टेनिस जगतात ज्यांच्या खेळाक़डे पाहून अनेकांनी आपल्याला टेनिसपटू व्हायचं स्वप्न ठेवलं. त्या दोन्ही खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर देशाला विजेतपदं मिळवून दिली. कालांतरानं त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यानं एकत्र न खेळण्याचा निर्णय घेतला. या साऱ्या प्रवासाला चित्रबद्ध करुन ते प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय झी 5 नं घेतला आहे. या दोन्ही खेळाडूंनंतर भारतीय टेनिस विश्वाला त्यांच्यासारख्या खेळाडूंची उणीव ही नेहमीच जाणवत राहिली. सध्या त्यांच्याकडे येणाऱ्या एका वेबसीरिजची मोठी चर्चा आहे. त्या मालिकेचं नाव ब्रेक पॉइंट असं आहे. ती सात भागांची मालिका आहे. झी5 पुरस्कार विजेती निर्माता जोडी अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपति यांचे ऑफ-कोर्ट जीवन आणि त्यांच्या प्रतिष्ठित अशा ऑन-कोर्ट भागीदारीवर आधारित ही मालिका असणार आहे.

निर्मात्यांनी या झी5 ओरिजिनल सीरीजचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. 'ब्रेक पॉइंट'च्या दिग्दर्शनाविषयी बोलताना, अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी म्हणाले की, "झी5 सारख्या घराघरात पोहोचलेल्या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मवर अशा तऱ्हेच्या सीरीजला दाखवण्यात येणार आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. महेश भूपति आणि लिएंडर सारख्या आयकॉन्ससोबत काम करणे अद्भुत होते आणि त्यांची अव्यक्त कहाणीला पडद्यावर उतरवणे अशी गोष्ट आहे, जी आम्ही नेहमीच जपून ठेवू इच्छितो.” लिअँडर पेस हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आणि टेनिसशी संबंधित एक नाव आहे.

loading image
go to top