Mahesh Kothare: महेश कोठारे यांना राहतं घर विकावं लागलं तेव्हा...

महेश कोठारे यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आलेली कि त्यांना त्यांचं राहतं घर विकावं लागलेलं.
mahesh kothare, mahesh kothare father
mahesh kothare, mahesh kothare fatherSAKAL
Updated on

महेश कोठारे हे मराठी इंडस्ट्रीतील महत्वाचं नाव. महेश कोठारे यांनी काहीच दिवसांपूर्वी डॅमइट या त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. महेश कोठारे यांनी स्वतः हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक लिहिताना महेश कोठारे यांना त्यांच्या आयुष्याचा संघर्षाचा काळ लिहावा लागला. महेश कोठारे यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आलेली कि त्यांना त्यांचं राहतं घर विकावं लागलेलं.

mahesh kothare, mahesh kothare father
Mahesh Kothare: मी दहावीत असताना.. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला 'धुमधडाका' चित्रपटाचा किस्सा

पुस्तक प्रकाशनावेळी महेश कोठारे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तो काळ महेश कोठारे यांच्यासाठी खडतर होता. जेव्हा महेश कोठारे हे पुस्तक लिहीत होते तेव्हा तो तो जूना काळ लिहिताना त्यांना आश्चर्य वाटले की तो काळ कसा गेला आणि तो कसा टिकला. एक वेळ अशी आलेली की महेश कोठारे यांच्या डोक्यावर छप्पर नव्हते. जबाबदारी पेलण्यासाठी महेश यांना त्यांचं राहत घर विकावं लागलं.

आदिनाथ त्याच्या कॉलेजच्या दिवसात होता आणि त्याला एमबीएला प्रवेश घ्यायचा होता. आधीच महेश कोठारे यांची खूप कठीण परिस्थिती होती. आदिनाथला घरची परिस्थिती ठाऊक होती, त्यामुळे त्या काळात आदिनाथने बाबांकडे कोणतीही मागणी केली नाही. महेश कोठारे यांना प्रचंड दुःख होत होते परंतु आर्थिक अडचणीचा त्यांनी कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

mahesh kothare, mahesh kothare father
Actor Ambar Kothare Passes Away: महेश कोठारे यांना पितृशोक! ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन..

एकेकाळी डोक्यावर छप्पर नसलेले महेश कोठारे आज अनेक दर्जेदार मराठी मालिकांचे निर्माते आहेत. महेश कोठारे यांच्या मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. कालच महेश कोठारे यांना पितृशोक झाला. महेश कोठारे यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते अंबर कोठारे यांचं निधन झालं.

महेश कोठारे यांच्या प्रत्येक सिनेमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘दे दणादण’ या सिनेमात अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृतींमध्येहीदेखील त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com