bigg boss marathi 4: यंदाची थीम आहे 'ऑल इज वेल', जाणून घ्या म्हणजे नेमकं काय?

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकर यांनी या थीम विषयी खुलासा केला.
mahesh manjarekar revealed bigg boss marathi season 4 theme all is well in press conference
mahesh manjarekar revealed bigg boss marathi season 4 theme all is well in press conference sakal

bigg boss marathi 4 : ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाची उत्कंठा संपली असून येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याने अधिकच उत्सुकता आहे. वाद, भांडण, दंगा, प्रेम याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा खेळ बराच लोकप्रिय आहे. या खेळाला दरवर्षी एक थीम दिली जाते. यंदाची थीम आहे 'ऑल इज वेल'. आता ऑल इज वेल म्हणजे सगळं काही छान आहे, त्यामुळे घरातील एकूण परिस्थिती पाहता ही थीम आणि बिग बॉसचं घर म्हणजे अतिशयोकक्तीच. पण ही थीम नेमकी काय आहे, ते जाणून घेऊया.. (mahesh manjarekar revealed bigg boss marathi season 4 theme all is well in press conference )

'इथे दिसतं तसं नसतं', 'ये पब्लिक है सब जानती है', 'अनलॉक एंटरटेनमेंट' अशा विविध थीम घेऊन आजवर बिग बॉस मराठी आपल्यासमोर आलं. मागच्या तीनही पर्वाने आपले भरभरून मनोरंजन केले. बिग बॉस चे चौथे पर्व कधी होणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेरी ती संपली असून 2 ऑक्टोबर रोजी हा शो सुरू होणार आहे. पण यंदाची 'ऑल इज वेल' ही थीम काही प्रेक्षकांच्या लक्षात आलेली नाहीय. सतत भांडण, वाद होणाऱ्या या घरात 'ऑल इज वेल' कसं असू शकतं. म्हणूनच नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत महेश मंजेकरांना ही थीम नेमकी काय आहे असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर महेश मांजरेकर म्हणाले, हे प्रकरण नेमकं काय आहे ते २ ऑक्टोबरलाच कळेल असं उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेचं सूत्रसंचालन अभिनेता आणि बिग बॉस च्या तिसऱ्या पर्वाचा स्पर्धक विकास पाटील याने केलं होतं. यावेळी विकासने महेश सरांना विचारलं की मग या वर्षातील तुमचा 'ऑल इज वेल' क्षण कोणता? त्यावर मांजरेकरांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांचं मन जिंकलं. मांजरेकर म्हणाले, 'मी कॅन्सर मधून बाहेर आलो. ऑपरेशन झाल्यानंतर डोळे उघडून पाहिलं. तीच माझ्यासाठी ''ऑल इज वेल' मोमेंट होती.'

पुढे ते म्हणाले, 'माझं कॅन्सरचं ऑपरेशन जवळजवळ १५ तास चाललं होतं. या १५ तासानंतर मी जेव्हा डोळे उघडले, मी जिवंत आहे हे मला जाणवलं तेव्हाच मी म्हटलं 'ऑल इज वेल'.'' मांजरेकरांनी दिलेल्या या उत्तरामुळे उपस्थितांनी त्यांचं कौतुक केलं आहे. महेश मांजरेकर गेल्यावर्षी कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारातून बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे या आजारपणातही ते चित्रीकरण करत होते. लवकरच ते स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com