अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्न बंधनात! नवरीला पाहताच नवरदेव भावुक, व्हिडिओ व्हायरल Mahira Khan Wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahira Khan Wedding:

Mahira Khan Wedding: अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्न बंधनात! नवरीला पाहताच नवरदेव भावुक, व्हिडिओ व्हायरल

Mahira Khan Wedding: पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान हिचे भारतातही लाखो चाहते आहेत. 2017 मध्ये तिने शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांपासून माहिरा लग्न करणार अशा चर्चा सुरु होत्या. तर माहिरा खानने रविवारी तिचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्न केले. हे माहिराचे दुसरे लग्न आहे. सलीम आणि माहिरा गेल्या पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. माहिराच्या लग्नाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

माहिरा आणि सलीमचा शाही विवाहसोहळा पाकिस्तानामध्ये पार पडला. या लग्नाचा पहिला व्हिडिओ माहिराचे मॅनेजर अनुशय तलहा खान याने शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये, माहिरा खान पेस्टल लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. यावेळी, तिचा चेहरा झाकला होता. जो लोकांचे लक्ष वेधून घेत होता.

यावेळी तिच्या पतीलाही माहिरला वधूच्या पोशाखात पाहून अश्रू अनावर झाले. सलीमने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती ज्यावर त्याने निळ्या रंगाची पगडी बांधली होती.

दोघांची जोडी खूपच छान दिसत होती. माहिरा खानच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

सलीम करीम हा एक बिझनेसमन आहे. फक्त कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित दोघांचा विवाह सोहळा पार पडला.

यापुर्वी 2007 मध्ये माहिरा खानचे अली अक्सरीसोबत पहिले लग्न केले होते. दोघेही लॉस एंजेलिसमध्ये भेटले होते. अली अक्सरी हा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. या दोघांना मुलगा अझलान आहे. मात्र 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. माहिराच अझलानचा सांभाळ करते. आता माहिराने पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.