जाता जाता थांबली,'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद नाही तर नव्या वेळेत..

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सुरू ठेवण्याचा निर्णय झी मराठी वाहिनीने घेतला आहे.
majhi tujhi reshimgath serial coming on new timing not going off air zee marathi
majhi tujhi reshimgath serial coming on new timing not going off air zee marathisakal
Updated on

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार होती. त्या ऐवजी नव्या मालिकेची घोषणा देखील वाहिनीने केली होती. परंतु 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंड करू नका असा प्रेक्षकांनी रेटाच लावला. त्यामुळे यशाच्या शिखरावर असलेली ही मालिका आणखी काही काळ सुरू ठेवण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. (majhi tujhi reshimgath serial coming on new timing not going off air zee marathi)

'झी' मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath ) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेच्या माध्यमातून वेगळी प्रेमकथा हाताळण्यात आली. लग्न झालेल्या आणि पदरी एक मुलगी असलेल्या नेहाची ही कथा आहे. नंतर ती एका उद्योगपतीच्या प्रेमात पडते, तो तिला स्वीकारतो आणि त्यांच्या सुखी सांसारला सुरुवात होते, अशा धाटणीचे हे कथानक आहे. ही मालिका चांगलीच चर्चेत असून यश आणि नेहा आणि परी ही तीनही पात्रे चाहत्यांच्या अत्यंत जवळची आहेत. प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मायरा वायकुळ यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा होती. परंतु गेल्या काही दिवसात प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहुन ही मालिका सुरू ठेवण्यात येणार आहे. फक्त त्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा शेवटचा भाग 17 सप्टेंबरला प्रसारित होणार होता. मालिकेचं शूटिंगदेखील पूर्ण झालं होतं. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक नाराज झाले होते. पण मालिकेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

झी मराठीने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद होणार नसल्याची माहिती दिली आहे. 'ही रेशीमगाठ तुटायची नाय...' असं म्हणत झी मराठीने नेहा, परी आणि यशचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे," एवढ्या सहजासहजी कशी तुटेल तुमची आणि आमची रेशीमगाठ". ही मालिका 19 सप्टेंबर पासून संध्याकाळी 6.30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com