Prarthana Behere: श्रेयस-प्रार्थनाचा रोमान्स पाहून नवऱ्यानेच केली कमेंट, म्हणाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

majhi tujhi reshimgath zee marathi serial prarthana behere shreyas talpade romatic scene goes viral prarthana's husband comment on this video

Prarthana Behere: श्रेयस-प्रार्थनाचा रोमान्स पाहून नवऱ्यानेच केली कमेंट, म्हणाला..

majhi tujhi reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. कारण या मालिकेने निरोप घेता घेता पुन्हा भरारी घेतली. गेल्या काही आठवड्यात नेहा आणि यश यांच्या लव्ह स्टोरी मध्ये रंगत आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला गेली आहे. अशातच यश आणि नेहाचा एक रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या रोमॅंटिक व्हिडिओला तिच्या नवऱ्यानेच कमेंट केली आहे.

(majhi tujhi reshimgath zee marathi serial prarthana behere shreyas talpade romatic scene goes viral prarthana's husband comment on this video)

सध्या प्रार्थना-श्रेयसच्या (prarthana behere) (shreyas talpade)ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला प्रेक्षक चांगलीच पसंती देत आहेत. या मालिकेत प्रार्थनाने नेहा तर श्रेयसने यश हे पात्र साकारले आहे. मध्यंतरी यश-नेहाच्या नात्यामध्ये दुरावा आला होता पण आता तो दूर होऊन त्यांच्या नात्याला नवे वळण मिळाले आहे. आगामी भागात यश-नेहामध्ये रोमान्स पाहायला मिळणार आहे. दोघांमध्ये आता जवळीक निर्माण झाली असून त्यांचा एक व्हिडिओ प्रार्थनाने शेअर केला आहे.

प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये श्रेयससह ती “और क्या” या सुपरहिट हिंदी गाण्यावर रोमान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकरने तिचा या रोमँटिक व्हिडीओ पाहून कमेंट केली आहे. आपल्या पत्नीचा हा सुंदर व्हिडीओ पाहून अभिषेकने तिला कमेंटच्या माध्यमातून “आय लव्ह यू” असं म्हटलं आहे. तसेच प्रार्थनानेही त्याला प्रतिसाद देत “आय लव्ह यू टू” म्हणत नवऱ्यावर प्रेम व्यक्त केलं. सध्यातरी यश-नेहाचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्याही विशेष पसंतीस पडत आहे.