
शनाया आणि गॅराचं नाही तर राधिका आणि सौमित्र अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे.
मुंबई : डिसेंबर हा एकुणच लग्नसोहळ्याचा सिझन होता. यामध्ये मराठी मालिकाही मागे नाहीत. झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्धा मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' मध्येही आता लग्नकार्य पार पडणार आहे. शनाया आणि गॅराचं नाही तर राधिका आणि सौमित्र अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे.
राधिका आणि सौमित्र यांच्या लग्नाचा सोहळा येत्या 23,24 आणि 25 डिसेंबरला होणार आहे. त्याची तयारी जोरदार सुरु असल्याचं दिसून येतय. झी मराठीने त्या दोघांच्या लग्नाची पत्रिकाही शेअर केली आहे. 'कारणं द्यायची नाही. सोमवारपासून राधिका सौमित्रच्या आनंदात सहभागी व्हायलाच नक्की यायचं' असं कॅप्शनही दिलं आहे.
हळद, संगीत आणि लग्न मोठ्या थाटामाटात पार पडणार असून त्याचा ट्रेलरही इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. याशिवाय लग्नाची तयारी आधीपासूनच करण्यात आली.
साड्यांची खरेदी आणि राधिकाच्या लग्नाची साडी घेण्याची तयारीही सुरु आहे. ट्रेलर पाहिल्यावर तीन दिवसाचे एपिसोड जबरदस्त असणार असल्याचं लक्षात येत आहे. राधिकाच्या लग्नात सर्वच मंडळी उत्साहात असल्याने तेही तयारीत दिसत आहेत.
लग्नाच्या दिवशी शनाया आणि गॅरीची रिअॅक्शन काय असणार आहे हे पाहण्यासाठी
24,25 आणि 26 च्या एपिसोड पाहावा लागेलच. काही दिवसांपूर्वीच झी मराठी वरच्या 'होममिनिस्टर' मध्येही राधिका आणि सौमित्रने सहभाग घेतला होता.
सोशल मीडियावर सध्या त्यांच्या लग्नाचीच चर्चा पाहायला मिळतेय.