Post Office Ughad Aahe: गुरुशिष्याची जोडी एकत्र! मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे उडवणार हास्याचे बार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

makarand anaspure and dilip ghare together in Post Office Ughad Aahe serial on sony marathi

Post Office Ughad Aahe: गुरुशिष्याची जोडी एकत्र! मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे उडवणार हास्याचे बार..

सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळत आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, आता या मालिकेत महत्वाचा ट्विस्ट येणार आहे.

(makarand anaspure and dilip ghare together in Post Office Ughad Aahe serial on sony marathi)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातले विनोदी अभिनेते या मालिकेत आहेत. सर्वांचे आवडते आणि लाडके मकरंद अनासपुरेही या मालिकेतून आपले मनोरंजन करत आहेत. या मालिकेत आता एक विशिष्ट जोडी पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Amruta Khanvilkar: व्वा! अमृता खानविलकर ठरली महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री..

मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे ही गुरुशिष्यांची जोडी ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे...' या मालिकेत दिलीप घारे हे मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांचा भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत.

दिलीप घारे हे माझे अभिनयातले गुरू आहेत, असं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिलीप घरे यांनी मकरंद अनासपुरे यांना अभिनय शिकवला आणि आता हे दोघे दिग्गज आपल्याला एकाच मालिकेत दिसणार आहेत. त्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. वडील आणि मुलगा यांची ही मराठवाड्यातली सुंदर जोडी आपल्याला पाहता येणार आहे. याबद्दल मकरंद अनासपुरेही उत्सुक आहेत.