शरीरावरचे स्ट्रेच मार्क्स अन् पांढऱ्या केसांंना पाहून मलायका म्हणते....Malaika Arora | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaika Arora

शरीरावरचे स्ट्रेच मार्क्स अन् पांढऱ्या केसांंना पाहून मलायका म्हणते...

मलायका अरोरा(Malaika Arora) म्हणजे डोळ्यासमोर हॉट,सेक्सी,ग्लॅमरस अंदाजातली कमनीय स्त्री पटकन डोळ्यासमोर येते. पण अशी मलायका जेव्हा पांढऱ्या केसांची प्रशंसा करायला लागते तेव्हा तिचं कौतूक वाटतं. मलायका नेहमीच स्टायलिश पेहरावात आपल्याला अनेक कार्यक्रमातनं,सोहळ्यातनं,किंवा अगदी तिच्या कौटुंबिक कार्यक्रमातनं ती त्याच फॅशनेबल अंदाजात दिसते. अनेकदा तिच्या स्टाईलवरनं ती ट्रोल होते. पण त्यानं तिला काही फरक पडत नाही. ती तितक्याच बिनधास्तपणे कोणतीही नवी फॅशन कॅरी करताना दिसते. नुकत्याच एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

हेही वाचा: अक्षयचा निर्मात्यांना दम; 50 दिवसांत शूटिंग पूर्ण करा नाहीतर...

तिनं म्हटलंय,''मला लोकांनी 'सेक्सी' म्हटलेलं आवडतं. पण यासाठी माझ्या शरीरावरील स्ट्रेच मार्कना घेऊन माझ्या मनात कधीच असुरक्षिततेची भावना नसते. वय वाढत जाणं,वृद्धावस्था येणं हे निसर्गतः ठरलेलं आहे,त्याकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते''. तसं पाहिलं तर मलायकाचं वय झालंय असं कोण म्हणेल. आजच्या घडीची बॉलीवूडमधील ती पॉप्युलर सेलिब्रिटी आहे. १९ वर्षांच्या मुलाची आई असूनही तिनं ज्या पद्धतीनं स्वतःला ठेवलंय ते पाहिल्यावर तिचं नक्कीच कौतूक वाटतं.

हेही वाचा: The Kashmir Files:सिनेमा पाहून प्रेक्षक रडतायत,एका महिलेनं तर चक्क...

मलायका म्हणते,''लोकांनी फिकी,थंडी है म्हणण्यापेक्षा सेक्सी,स्पायसी म्हटलेलं कधीही उत्तम. मी महिन्यातले १५ दिवस खूप आनंदी असते,ज्या दिवसांत मला आनंदी रहायला आवडतं पण इतर १५ दिवसांत मी खूप कमजोर असते. मला काहीच करू नये असं वाटतं. स्त्रीयांच्या शरीरातील नैसर्गिक बदलाचा हा परिणाम असतो. जो मी दर महिन्याला अनुभवते''. तिनं इथे आवर्जुन काही गोष्टी नमूद केल्यात त्या प्रत्येकाला कादाचित लागू होतील. ती म्हणालीय, ''मी कधीच वर्षागणिक पांढरे होत जाणाऱ्या माझ्या केसांचे टेन्शन घेत नाही. उलट मी समजते त्या पांढऱ्या केसांनी मला अधिक शहाणपण दिलं. माझी अनेक वर्ष आनंदात परावर्तित केली. त्यामुळे वाढत्या वयाचा,त्या अनुरुप होणाऱ्या बदलांचाही मी आदर करते''.

Web Title: Malaika Arora Speaks About Body Stretch Marks Grey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top