हॉट दृश्यासाठी निर्मात्याला मल्लिकाच्या कमरेवर भाजायची होती चपाती | Mallika Sherawat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mallika sherawat

हॉट दृश्यासाठी निर्मात्याला मल्लिकाच्या कमरेवर भाजायची होती चपाती

बॉलिवूड चित्रपटांमधील बोल्ड दृश्यांसाठी अभिनेत्री मल्लिका शेरावत Mallika Sherawat ओळखली जाते. मात्र अशी दृश्ये करताना अनेकदा विचित्र अनुभव आल्याचा खुलासा तिने केला. एका गाण्याच्या चित्रपटादरम्यान निर्मात्याने माझ्या कमरेवर चपाती भाजण्याची कल्पना सुचवल्याचं मल्लिकाने सांगितलं. 'द लव्ह लाफ लाइव्ह शो' दरम्यान मल्लिकाने हा अनुभव सांगितला. निर्मात्याची विचित्र मागणी ऐकून मल्लिकाने त्या गाण्यास नकार दिला होता.

त्या प्रसंगाविषयी सांगताना ती म्हणाली, "निर्मात्याला असं वाटतं होतं की, तो खूप हॉट सीन आहे. प्रेक्षकांना कसं समजणार की तू हॉट आहेस? तू इतकी हॉट आहेस की तुझ्या कमरेवर मी चपाती भाजू शकतो, असं तो मला समजावत होता. तुम्ही अशा दृश्याचा विचार तरी करू शकता का? मी त्यांना स्पष्ट नकार दिला. पण मला त्यांची कल्पना खूप मजेशीर वाटली."

हेही वाचा: KBC 13: सात कोटींच्या 'या' प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का?

"भारतीय महिलांच्या हॉटनेसबद्दल निर्माते-दिग्दर्शकांची खूप विचित्र संकल्पना आहे असं मला वाटतं. मी त्यांना समजूच शकत नाही. हे खरंय की आता या परिस्थितीत खूप बदल झाला आहे. पण जेव्हा मी करिअरची सुरुवात केली, तेव्हा गोष्टी फार विचित्र होत्या", असं ती पुढे म्हणाली.

'मर्डर', 'ख्वाहिश' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली मल्लिका तिच्या बोल्ड दृश्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली. मल्लिकाने २००३ मध्ये 'ख्वाहिश' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी तिने 'मर्डर' चित्रपटात भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने बोल्ड दृश्ये दिली होती. "२००४ मध्ये जेव्हा मी मर्डर या चित्रपटात भूमिका साकारली होती, तेव्हा त्यातील हॉट आणि बोल्ड दृश्यांसाठी माझी नैतिकदृष्ट्या हत्याच झाली होती. त्यावेळी मी चित्रपटांत केलेले सीन्स आता फार सामान्य वाटतात. आता लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे आणि आपला चित्रपटसुद्धा बदलला आहे", असं मल्लिका एका मुलाखतीत म्हणाली होती.

loading image
go to top