मल्लिका शेरावत म्हणतेय, 'ही बलात्काऱ्यांची भूमी....'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सध्या देशात जे घडतयं त्यावरुन तरी ही भूमी बलात्काऱ्यांची भूमी झाली आहे. - मल्लिका शेरावत

अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत नव्हती. तिच्या बऱ्याच वादग्रस्त किंवा बोल्ड विधानांनी ती अनेकवेळा चर्चेत राहीली. आताही तिने नुकताच व्यक्त केलेलं मतही चर्चेचा विषय बनलं आहे. 

सध्या देशात लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. या घटनांचा मल्लिकाने निषेध व्यक्त केला आहे. 'दास देव' या सिनेमाच्या स्क्रिनींगला मल्लिकाने उपस्थिती लावली, तेव्हा तिने देशात सतत घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर राग व्यक्त करीत आपले मत मांडले. काय म्हटले आहे मल्लिकाने वाचा सविस्तर....

'भारत हा महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा या मार्गावर चालणारा देश आहे. पण सध्या देशात जे घडतयं त्यावरुन तरी ही भूमी बलात्काऱ्यांची भूमी झाली आहे. सध्या देशात मुलींवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा मी निषेध करते. हे आपल्यासाठी फार लाजिरवाणे आहे. देशात प्रसारमाध्यमे हे प्रभावी साधन असून प्रसारमाध्यमांच्या मदतीने अशा घटनांना थांबविले गेले पाहीजे. जर प्रसार माध्यमे नसती तर ज्या घटना झाल्यात त्या कधीच जगासमोर आल्या नसत्या. अशा घटनांचा प्रसारमाध्यमांनी सतत पाठपुरावा केल्याने चांगले आणि नवीन कायदे मंजूर होत आहे. म्हणून मी प्रसारमाध्यमांचे ऋणी आहे.'

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mallika Sherawat Says India Is A Land Of Rapist