'शाहरूखची हिरोईन करतो', असं सांगून युवतींची तस्करी करणारा गजाआड

बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेत काम करण्यासाठी रोज हजारो तरुण मुंबापुरीत दाखल होतात.
king khan
king khan file

मुंबई - बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेत काम करण्यासाठी रोज हजारो तरुण मुंबापुरीत दाखल होतात. त्यातल्या प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. आपल्या आवडीच्या अभिनेत्याप्रमाणं होणं हे त्यांचं स्वप्न असतं. अर्थात प्रत्येकाचं स्वप्न खरं होत नाही. मात्र त्यांच्या वाट्याला फसवणूकीचे अनेक प्रकार येतात. अशा घटना समोर आल्या आहेत. सध्या एक मोठी घटना यासंबंधी घडली आहे. त्यात बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या चित्रपटात काम देतो असे सांगून एकानं युवतींची थेट तस्करीच केली. (man arrested by police who promising girls to get a role in shahrukh khan film yst88)

अखेर मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोठमोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटात काम देतो असे सांगून त्यानं अनेकांची फसवणूक केली होती. हे समोर आलं आहे. यापूर्वी देखील बॉलीवूडच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची अनेक प्रकरणं प्रकाशात आली आहेत. आताची जी घटना आहे त्यात ती व्यक्ती मुलींना बॉलीवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांचे नाव घेऊन त्यांना फसवण्याचे काम करत होता. शेवटी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो स्वताला इव्हेंट मॅनेजर असल्याचे सांगायचा. त्यानंतर त्याला भेटायला येणाऱ्या मुलींना आपण तुम्हाला शाहरुखच्या चित्रपटामध्ये काम देतो असे सांगायचा. त्याच्या या अमिषाला मुली बळी पडायच्या. आणि त्याच्या जाळ्यात अडकायच्या. अशाप्रकारे त्यानं अनेकांची फसवणूक केली होती. काही दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. तो त्यांच्या हातावर तूरी देऊन निसटत होता. शेवटी त्याला दादर येथून पोलिसांनी ताब्यात घेतला.

king khan
नवऱ्यानंतर बायकोही अडचणीत, शिल्पा शेट्टीच्या घरी क्राईम ब्रँचचा छापा
king khan
शाहिदच्या 'मीराचा' नवीन लूक, ओठ पाहून चाहते 'हँग'

याप्रकरणी पश्चिम बंगालमधील एका अल्पवयीन मुलीनं पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तिनं आपल्याला शाहरुखच्या नावानं फसवलं आणि मुंबईत आणलं गेलं. असं सांगितलं आहे. फेसबूकवर त्या मॅनेजरशी तिची ओळख झाली होती. त्यानं तिला फुस लावून पश्चिम बंगालमधील पलाशीपारा येथून मुंबईत आणलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com