Manasi Naik Video: जानू विना रंगच नाय!.. मानसी नाईकचा नादखुळा डान्स व्हायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manasi Naik dance on janu vina rangch nay viral Video in instagram

Manasi Naik Video: जानू विना रंगच नाय!.. मानसी नाईकचा नादखुळा डान्स व्हायरल..

Manasi Naik: अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. पती प्रदीप खरेरापासून ती विभक्त होत असून कोर्टात केस दाखल झालेली आहे. असे असले तरी या सगळ्याचा मानसी आपल्या दैनंदिन आयुष्यावर कुठेही परिणाम होऊ देत नाहीय. अशा अवस्थेत काहीतरी दुःखी, उपदेश देणारं पोस्ट करण्यापेक्षा टी रोज नव्या व्हिडिओ आणि फोटो शेयर करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या चाहत्यांना ही आनंद देत आहे. असाच एक मानसीचा व्हिडिओ आता तूफान व्हायरल होत आहे.

(Manasi Naik dance on janu vina rangch nay viral Video in instagram)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: फिनालेच्या पूर्वतयारी दरम्यान प्रसाद- अमृता झाले रोमँटिक..

मानसीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मिडियावर रोज नव्या पोस्ट शेयर करत असते. तिच्या रील्सलाही प्रचंड पसंती मिळते. मानसी आणि डान्स ही अविभाज्य नातं असल्याने ती जेव्हा जेव्हा थीरकते तेव्हा आपल्यालाही तिच्यासोबत थिरकायला भाग पाडते. अशीच काहीशी अवस्था तुमचीही होईल, ही रील पाहून..

हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

मानसीने सोशल मिडियावर ट्रेंड होत असलेल्या 'जानू विना रंगच नाय' या गाण्यावर डान्स केला आहे. काळ्या रंगाची नववारी, पायात घुंगरु आणि साज शृंगार करून तिने हा व्हिडिओ केला आहे. तिच्या या व्हिडिओने नुसता धुमाकूळ घातला आहे. सोबतच तिने 'पब्लिक डिमांड वरुन' हा व्हिडिओ शेयर करत असल्याचे कॅप्शन मध्ये म्हंटले आहे.

मानसीचे करियर फारसे चित्रपटात होऊ शकले नाही पण तिने गाण्यांवर मात्र वेगळीच छाप उमटवली आहे. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ आणि नुकतेच आलेले 'बाई एकदम कडक' या गाण्यांनी तिला चांगलीच प्रसिद्धी दिली. आता हा तिचा व्हिडिओ म्हणजे चाहत्यांना एक नवी पर्वणीच आहे.

टॅग्स :Manasi Naik