पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी राज यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती.
पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट

प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीचा (mandira bedi) पती आणि दिग्दर्शक राज कौशल (raj kaushals) यांचे कार्डिअॅक अरेस्टने 30 जून रोजी निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. पतीच्या निधनानंतर मंदिरा आणि तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी राज यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. यावेळी रोनित रॉय, आशिष चौधरी यांनी मंदिराचं सांत्वन केलं. पतीच्या निधनानंतर मंदिराने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे. (mandira bedi first post after husband raj kaushal death)

राजच्या निधनानंतर मंदिराची पहिली पोस्ट

मंदिराने राजसोबतचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये हार्टब्रेकचा इमोजी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज आणि मंदिरा खूप आनंदी दिसत आहेत. हातात वाईन ग्लास घेऊन दोघे डिनर टेबलवर बसलेले दिसत आहेत. या फोटोवर अष्का गोराडिया, हरभजन सिंग, मिथिला पालकर, अरमान मलिक यांनी कमेंट्स केल्या आहेत. राजच्या निधनानंतर मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा प्रोफाइल फोटो काढून टाकला आहे. मंदिराच्या प्रोफाइलवर आता फक्त काळा रंग पाहायला मिळतो. ट्विटरवर मात्र मंदिराने काहीही बदल केलेला नाही.

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट
पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदिने उचललं 'हे' पाऊल

मंदिरा बेदी आणि राज कौशलने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना तारा ही मुलगी आणि वीर हा मुलगा आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंदिरा आणि राजने चार वर्षीय ताराला दत्तक घेतलं. राजने 'अँथनी कौन है' (२००६), 'शादी का लड्डू' (२००४), 'प्यार मे कभी कभी' (१९९९) या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. २०२० मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत मंदिराने पतीविषयी म्हटलं होतं, 'राजने मला नेहमीच प्रोत्साहित केले आहे. तो माझी ताकद आहे.'

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीची पहिली पोस्ट
'ही तर मूर्खपणाची हद्दच'; मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली गायिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com