Mandira Bedi Talks About Late Pregnancy, she didnt wanted to spoil her career after had child
Mandira Bedi Talks About Late Pregnancy, she didnt wanted to spoil her career after had childsakal

Mandira Bedi Birthday: आई होण्यापेक्षा करिअरला दिलं महत्व; बारा वर्षानंतर घेतला 'चान्स'..

40 व्या वर्षी आई झालेल्या मंदिरा बेदीला वाटत होती करियर संपण्याची भीती..

पहिली महिला स्पॉट्स अँकर म्हणून बहुमान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे मंदीरा बेदी. मंदिरानं ९० च्या दशकात मालिकाविश्वात अक्षरशः स्वतःची दहशत निर्माण केली होती. दमदार अभिनय आणि तशाच तकडीच्या भूमिका यामुळे मंदिराने आपला चांगलाच ठसा रसिक मनावर उमटवला होता.

अशा मंदिरा बेदीचा आज वाढदिवस. आज ती 51 वर्षांची झाली असून 52 व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंदिरा आपल्या कामाप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. त्यापैकीच एक म्हणजे तीचं आई होणं. आपलं करियर संपू नये म्हणून आई होण्यापासून ती लांब राहिली. पण मंदीरानं नेमकं हे का आणि कशासाठी केलं ते जाणून घेऊया..

(Mandira Bedi Talks About Late Pregnancy, she didnt wanted to spoil her career after had child)

Mandira Bedi Talks About Late Pregnancy, she didnt wanted to spoil her career after had child
Sayali Sanjeev: सायली संजीव पडली सुषमा अंधारेंच्या प्रेमात.. म्हणाली, तुम्ही जे बोलता...

मंदिराने आजवर अनेक मालिका केल्या, मात्र चित्रपटांमध्ये तिचा फारसा जीव रमला नाही. पण सर्वात प्रथम करिअरकडे लक्ष देणारी अभिनेत्री म्हणूनही मंदिराचा उल्लेख करावा लागेल. त्यासाठी तिनं आपल्या मातृत्वालाही नाकारलं होतं.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींविषयी खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, मी वयाच्या विशी पासून या क्षेत्रात काम करत आहे. मी माझ्या ताकदीवर माझं करिअर केलं आहे. तब्बल दहा वर्षांनी म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षीही मी स्वतला असुरक्षितच समजत होते. पण 40 वर्षांची झाल्यावर मला स्थिरता मिळाली, ज्यांचा मला आनंद आहे. आणि हीच स्थिरता मिळावी म्हणून मी 12 वर्षे मातृत्वापासून लांब राहिले.\

पुढे ती म्हणाली, ''लग्नानंतर तब्बल 12 वर्षानंतर मी आई झाले. मी 2011 मध्ये मुलाला जन्म दिला. त्यावेळी मी 39 वर्षांची होते. मला नेहमी भीती वाटायची की जर मी प्रेग्नेंट झाले तर माझे करिअर संपून जाईल. कारण मनोरंजन क्षेत्रात कमालीची स्पर्धा आहे. त्यातील राजकारणाविषयी मला चांगले माहिती होते. त्यामुळे मी सावध होते.''

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

''मला माझ्या जबाबदारीची जाणीवही होती. मात्र योग्य त्यावेळी काय करावे असा प्रश्न माझ्यापुढे होता. यासगळ्या निर्णयासाठी मला माझ्या पतीच्या सल्ल्याची गरज होती. त्याच्याशिवाय आमच्यातील नातं योग्य प्रकारे चालणार नव्हतं.''

पुढे ती म्हणाली, ''मनोरंजन क्षेत्रात महिलांचा प्रवास हा फार काळ चालत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. मला नेहमी त्याच गोष्टीची भीती वाटायची. चित्रपट आणि मालिकांमध्ये बराच काळ काम करणा-या कलाकारांमध्ये कालांतरानं असुरक्षितपणाची भावना येऊ लागते.''

मंदिरानं 1995 मध्ये दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधून अभिनेत्री म्हणून सुरुवात केली होती. मंदिरानं दिग्दर्शक राज कौशल यांच्याशी 1999 मध्ये लग्न केलं. आणि त्यानंतर 12 वर्षांनी ती आई झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com