Manoj Bajpayee: जेव्हा मुलीमुळं मनोज बाजपेयीवर आलेली मान खाली घालण्याची वेळ.. अभिनेत्यानं शेअर केला किस्सा

मनोज बाजपेयीनं मुलीच्या शाळेत पॅरेंट्स-टीचर मीटिंगला गेलेला असताना घडलेला एक प्रसंग सांगितला आहे.
Manoj Bajpayee About her daughter
Manoj Bajpayee About her daughterEsakal

Manoj BajpayeeL: बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयीचा नवीन सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे ज्यामध्ये मनोज बाजपेयीनं वकील पी.सी.सोलंकीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

सध्या मनोज बाजपेयी ओटीटीवर रिलीज झालेल्या त्याच्या 'एक बंदा काफी है' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यादरम्यान तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे. त्यांनं नुकतंच सांगितलं आहे की त्याच्या मुलीला हिंदी येत नाही आणि त्याची त्याला लाज वाटते. (Manoj Bajpayee about her daughter)

Manoj Bajpayee About her daughter
The Diary Of West Bengal: 'माझी जेलमध्ये हत्या होऊ शकते..', 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'च्या दिग्दर्शकाच्या पोस्टनं खळबळ

मनोज बाजपेयीनं सांगितलं की भले तो हिंदी सिनेमात काम करतो..हिंदी सिनेमाचं मोठं नाव आहे.. पण त्याच्या मुलीला मात्र हिंदी बोलता येत नाही. मनोजला या गोष्टीचं वाईट तेव्हा वाटलं जेव्हा मुलीच्या शाळेत मीटिंग दरम्यान तो तिच्या शिक्षकांना भेटला आणि त्यावेळी त्यांनी मनोजकडे मुलीची तक्रार केली आणि म्हटलं की एका हिंदी सिनेअभिनेत्याची मुलगी असूनही तुमच्या मुलीचं हिंदी इतकं खराब आहे.

Manoj Bajpayee About her daughter
Nushrratt Bharuccha: 'मी आज फूल झाले..'

मनोज यांना शिक्षक म्हणाले होते की-'मनोजजी हे सगळं काय आहे..मला खरंतर आनंद झाला हे जाणून की तुमची मुलगी माझ्या वर्गात आहे. पण जेव्हा मी तिचं हिंदी ऐकलं तेव्हा मला खूप दुःख झालं'.

ती म्हणाली,'मुझे हिंदी आता है'. जेव्हा मी तिला विचारलं की तुझ्या वडीलांचे नाव काय आहे तेव्हा ती म्हणाली,'मेरा पापा..' तिच्या तोंडून असं हिंदी ऐकून मला खरंच लाज वाटू लागली.

मनोज बाजपेयी संदर्भात बोलायचं झालं तर गेल्या तीन दशकापासून अभिनेता सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे आणि हिंदीत त्यानं बरेच सिनेमे केले आहेत. आज आपल्या अभिनयाच्या बळावर त्यानं चाहत्यांच्या मनात खास जागा बनवली आहे. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्यानं आपल्या पत्नीचा एक किस्सा सांगितला होता, ज्याची जोरदार चर्चा रंगली होती. स्वतःचा सिनेमा दाखवायला तो आपल्या पत्नीला थिएटरमध्ये घेऊन गेला होता तेव्हा त्याची भूमिका पाहून तिचा पारा चढला होता आणि खलनायकी पात्र रंगवण्यासाठी तिनं अभिनेत्याची चांगलीच शाळा घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com