'हीन पातळीचा व्यक्ती', सुनिल पालच्या आरोपांवर मनोज वाजपेयीचं सडेतोड उत्तर

'मनोज वाजपेयी अत्यंत उद्धट, हीन पातळीचा व्यक्ती'; सुनिल पालची टीका
manoj bajpayee, sunil pal
manoj bajpayee, sunil pal
Updated on

कॉमेडियन सुनिल पालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुनिल पाल हा अभिनेता मनोज वाजपेयीला 'उद्धट आणि हीन पातळीचा व्यक्ती' (बदतमीज और गिरा हुआ आदमी) म्हणतोय. इतकंच नव्हे तर मनोजच्या 'द फॅमिली मॅन' या लोकप्रिय वेब सीरिजची तुलना त्याने पॉर्नशी केली. सुनिलच्या या टीकांवर मनोज वाजपेयीने सडेतोड उत्तर दिलं आहे. हाती काम नसल्याने काही जण असे वागतात, अशा शब्दांत मनोजने उत्तर दिलं. (Manoj Bajpayee reaction on Sunil Pals gira hua comment slv92)

काय म्हणाला सुनिल पाल?

डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरशिप नसल्याचा फायदा काही मोठे कलाकार घेत असल्याची टीका सुनिलने केली. त्यानंतर त्याने मनोजच्या 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजवरही टिप्पणी केली. "मनोज वाजपेयी हा कितीही मोठा अभिनेता असला, त्याला कितीही पुरस्कार मिळाले असले तरी त्यापेक्षा उद्धट आणि हीन पातळीचा व्यक्ती पाहिला नाही. 'द फॅमिली मॅन' ही सीरिज पॉर्नसारखीच आहे. या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. हेसुद्धा एक प्रकारचं पॉर्नच आहे. पॉर्न फक्त दाखवण्यापुरतं नसतं, विचारांचाही पॉर्न असतो ", असं तो व्हिडीओत म्हणाला.

यावर प्रतिक्रिया देताना मनोज म्हणाला, "मी समजू शकतो की लोकांकडे काम नाही. मी पूर्णपणे समजू शकतो. अशा परिस्थितीतून मी स्वत: गेलोय. पण अशा परिस्थितीत लोकांनी ध्यानधारणा करावी."

manoj bajpayee, sunil pal
शिल्पा शेट्टीच्या बहिणीच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

सुनिल पाल २००५ साली 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या रिअॅलिटी शोचा विजेता ठरला होता. 'फिर हेरा फेरी' आणि 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका साकारल्या आहेत. सुनिलच्या या टिप्पणीमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com