माझ्या चित्रपटांना मिळते 'सावत्र आईची' वागणूक 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक नवीन कलाकार समोर येत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम यामुळे झाले आहे. एखादा बडा कलाकार ज्य़ावेळी सिनेमात असतो तेव्हा त्या चित्रपटाच्या आशयाकडे दुर्लक्ष होताना दिसते. याच कारणामुळे या क्षेत्रात येणारी पिढी कलाकारापेक्षा कटेंटकडे जास्त लक्ष देताना दिसते आहे. असे मनोजने सांगितले. 

मुंबई - रोजचा दिवस बॉलीवूडच्या एका नव्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आला आहे. बॉलीवूडचा प्रख्यात कलाकार आणि निर्माता मनोज वाजपेयीने माझ्या चित्रपटांना नेहमीच सावत्र आईसारखी वागणूक मिळत असल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या बॉलीवूडकडून आशयसंपन्न अशी निर्मिती होत नसल्याचे त्याने म्हटले आहे. येत्या काही दिवसांत मनोज वाजपेयीच्या फॅमिली मॅनचा 2 रा सीझन प्रदर्शित होणार आहे.

 बेवसीरीज असो वा हिंदी चित्रपट यात जे यंग टॅलेंट येते आहे ते प्रचंड मेहनती आहेत. त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या पसंतीस पडणारा कटेंट येतो आहे. त्याला दाद मिळते आहे हे पाहून समाधान वाटते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मनोज वाजपेयी याने त्याला येत असलेल्य़ा बॉलीवूडच्या क्लेशकारक अनुभवाचे कथन मुलाखतीतून एका बड्या इंग्रजी वृत्तपत्राला केले आहे. तो म्हणतो आपल्याकडे चित्रपटाचे जे वितरक आहे ते चित्रपटाच्या आशयाला महत्व न देता अमूक कलाकाराकडे पाहून अनेक गोष्टी ठरवतात. याचे वाईट वाटते. आमच्या सारख्यांच्या चित्रपटांना साईड लाईन केले जाते हे सांगायला हवे.

विशेषत; ज्या बेवसीरीज आहेत, छोटे चित्रपट आहेत त्यांना सावत्र आईची वागणूक मिळते आहे. ज्यावेळी प्रख्य़ात कलाकाराची भूमिका वेबसीरीज मध्ये असते त्यावेळी त्याला अशाप्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र यासगळ्या परिस्थितीत समाधानाची बाब अशी की आताच्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक नवीन कलाकार समोर येत आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम यामुळे झाले आहे. एखादा बडा कलाकार ज्य़ावेळी सिनेमात असतो तेव्हा त्या चित्रपटाच्या आशयाकडे दुर्लक्ष होताना दिसते. याच कारणामुळे या क्षेत्रात येणारी पिढी कलाकारापेक्षा कटेंटकडे जास्त लक्ष देताना दिसते आहे. असे मनोजने सांगितले.

माझ्या चित्रपटांनाही सापत्नपणाची वागणूक मिळाली आहे. प्रेक्षक ज्यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मवर किंवा टिव्हीवर सिनेमा पाहत असतात तेव्हा त्यांना त्यात आपल्या आवडीचा कलावंत हवा असतो. मात्र दरवेळी असे होणे शक्य नसते. कोरोनाच्या काळात तर हे शक्यच नाही. त्यामुळे आता या दरम्यानच्या काळात ज्या सीरीज प्रदर्शित झाल्या आहेत त्यावरुन आपल्याला कल्पना येईल. ही बड्या स्टारकास्टची मानसिकता याचा परिमाम नवीन टॅलेंटवर होणार नाही अशी आशा मला आहे.  मनोज वाजपेयी हा अभिषेक शर्मा यांच्या सुरज पे मंगल भारी या चित्रपटात दिसणार आहे. येत्या दिवाळीत तो प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manoj Bajpayee said that his films have been sidelined