'भिकू म्हात्रे'च्या 'लक्झरी लाईफ'चे का वाजलेयत तीनतेरा? Manoj Bajpayee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Bajpayee

'भिकू म्हात्रे'च्या 'लक्झरी लाईफ'चे का वाजलेयत तीनतेरा?

'द फॅमिली मॅन'(The Family Man) मुळे मनोज वाजपेयीनं (Manoj Bajpayee) एक अभिनेता म्हणून पुन्हा लोकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. त्या सीरीजमध्ये त्यानं साकारलेला रफ अॅन्ड टफ पोलिस ऑफिसर लोकांना आवडलाय. सीरिजच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरपूर पंसंती दिली. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोज वाजपेयी हे खणखणीत वाजणारं नाणं आहे असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. पण तरीही मनोज वाजपेयीनं नुकत्याच एका मुलाखतीत असं का बरं म्हटलं असेल की मला 'लक्झरी लाईफ' आता जगता येणं मुश्किल झालंय. चला जाणून घेऊया सविस्तर.

हेही वाचा: प्रियंकाच्या मुलीला बाळकृष्णाची लागली गोडी; 'त्या' फोटोनं वेधलं लक्ष

मनोज वाजपेयीच्या व्यस्त शेड्युलच्या भोवती हा सगळा विषय फिरतोय बरं का, २०२३ पर्यंत मनोज वाजपेयी शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त असल्याचं बोलंल जातंय. इतका बिझी आहे की दोन प्रोजेक्ट दरम्यान त्याला निवांत होण्यासाठी देखील उसंत नसल्याचं बोललं जात आहे. त्याविषयी स्पष्टिकरण देताना मनोज वाजपेयी म्हणाला,''कोरोनानं सगळंच वेळापत्रक बिघडवलं आहे. काही कलाकारांकडे एका प्रोजेक्टनंतर निदान आठवड्याभराचा,महिन्याभराचा वेळ आहे पुढच्या प्रोजेक्टसाठी वैचारिक-शारिरीक पातळीवर फीट रहायचा,तयारी करायचा पण माझ्याकडे इतकी लक्झरी नाही. माझ्यावर प्रोजेक्ट पूर्ण करायचं प्रेशर आहे सध्या. प्रत्येकाच्या आपल्या अशा अडचणी आहेत. आता मी देखील अनेक वर्षांपासून काम करत आहे सिनेमांत, पण मी नेहमी माझ्या एका प्रोजेक्टनंतर महिन्याभराचा ब्रेक घ्यायचो पण आता ते शक्यच नाही होत आहे. कोविडमुळे शूटिंग थांबलेलं होतं,जे आता पटापट मार्गी लावायचं आहे. माझं पहिलं काम आहे ते खोळंबलेल्या सिनेमांचे शूटिंग पूर्ण करणे''.

हेही वाचा: शूटिंग करताना अमिताभ बच्चननी का फोडला कॅमेरा?

मनोज वायपेयीनं खरंतर आता पन्नाशी ओलांडलीय. पण या वयातलं कामाचं प्रेशर तसं जास्तच आहे. पण तरिही तो मोठ्या उत्साहानं ते बिझी शेड्युल हॅंडल करताना दिसतोय. आता त्याच्या बाबतीत असं घडतंय की एक प्रोजेक्ट संपत नाही तोवर दुसऱ्या प्रोजेक्टची तयारी करावी लागतेय. याआधी असं घडत नव्हतं. ''दुसऱ्या प्रोजेक्टची तयारी मी किमान महिनाभर ब्रेक घेऊन करायचो,अगदी मी थिएटर करायचो तेव्हापासून...''असं तो म्हणाला. ''ओटीटी प्लॅटफॉर्म हे थिएटरपेक्षा मोठं काम करुन राहिलंय कोरोनाकाळात...'', यावर देखील या 'द फॅमिली मॅन' च्या अभिनेत्याने आपलं मत व्यक्त केलं. ''थिएटरमध्ये जसं सिनेमा प्रदर्शित झाल्यावर लोकांचा पाहण्यासाठी उत्साह असतो तसाच ओटीटीवर सिनेमा प्रदर्शित होण्याआधी असतो'', असंही तो म्हणाला. तर या शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमुळे त्याच्या 'लक्झरी लाईफ'चे तीनतेरा वाजलेयत.

Web Title: Manoj Bajpayees Doesnt Have Luxury To Prepare Stuck In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top