मन्टो ट्रेलर: 'इसका मतलब ये है की जमानाही नाकाबिल-ए-बरदाश्त है...'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

स्वातंत्र्याचा तो काळ होता. त्यामुळे या संवेदनशील काळात त्यांच्या साहित्य आणि अद्वितीय कथांनी लोकांवर वेगळीच छाप सोडली. मंटो या महान लेखकाच्या आयुष्यावर आधारीत 'मंटो' या सिनेमात नवाजुद्दीन यांनी मंटोची भुमिका साकारली आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या अभिनय शैलीने सिनेसृष्टीत वेगळी छाप सोडली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक मध्ये नवाजुद्दीन हे त्यांची भुमिका साकारणार आहे. त्यानंतर इतिहाततील आणखी एका महत्त्वपुर्ण भुमिकेत नवाजुद्दीन दिसणार आहे. सआदत हसन मंटो हे नाव जगप्रसिध्द आहे. त्यांचं लेखन प्रभावी आणि बोचरं असल्याने अनेकांच्या टिकेला त्यांना सामोरे जावे लागले होते. स्वातंत्र्याचा तो काळ होता. त्यामुळे या संवेदनशील काळात त्यांच्या साहित्य आणि अद्वितीय कथांनी लोकांवर वेगळीच छाप सोडली. मंटो या महान लेखकाच्या आयुष्यावर आधारीत 'मंटो' या सिनेमात नवाजुद्दीन यांनी मंटोची भुमिका साकारली आहे.

नुकताच 'मंटो'चा ट्रेलर प्रसिध्द झाला. ‘गुलाम थे तो आजादी का ख्वाब देखते थे, आजाद हुए तो कौलसा ख्वाब देखे’, ‘अगर मेरे अफसानो को बरदाश्त नही कर सकते, इसका मतलब ये है की जमानाही नाकाबिल बरदाश्त है’ ट्रेलरमधील असे संवाद थेट काळजाला भिडतात. देश पारतंत्र्यात होता तेव्हा आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्या आजुबाजूला खरचं काय परिस्थिती आहे यांवर आपले परखड मत मांडणारे आणि तेच लेखणीतून उतरवणारे मंटो यांना कसं झगडावं लागतं. हे सिनेमात दाखवलं आहे. नंदिता दास दिग्दर्शित या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीने सोबतच रसिका दुग्गल, ताहिर राज भसीन, दिव्या दत्ता आणि ऋषी कपूर यांच्याही भूमिका आहेत. 21 सप्टेंबर ला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manto Hindi Movie Trailer Release